नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या वतीने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात असून राज्यातील जनतेला कुठलीही अडचण येऊ नये म्हणून यासाठी राज्यातील गोरगरीब जनता उपाशी राहू नये याकरिता राशन दुकानावर सर्वांना गहू व तांदूळ अल्पदरात तर काही महिन्यात सरसकट मोफत देण्याची योजना महाराष्ट्र शासनाने राबविली आहे यामध्ये प्रत्येक गावातील स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्याकडील गरजू व गोरगरीब जनतेला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही व कोणीही धान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
मुक्रमाबाद गोदाम अंतर्गत ६० ते ७० स्वस्त धान्य दुकाने आहेत यातील अनेक स्वस्त धान्य दुकानदार आपल्या मर्जीप्रमाणे धान्य वाटप करतात व काही धान्य दुकानदार काही कारणे दाखवून दर महिन्याला देण्याचा धान्य आणून सुध्दा जाणीवपूर्वक वाटप करत नाहीत. धान्य आणण्यासाठी शिधापत्रिकाधारक गेले असता, त्यांना शिवीगाळ करून अरेरावीची भाषा करतात व लाभार्थ्यांना , गोर-गरीब जनतेला लुबाडतात तसेच स्वस्त धान्याचा भाव फलक लावणे, दुकानदार वजनात फसवणे, रेशन दुकानात लोकांना स्पष्टपणे वाचता येईल असा माहिती फलक लावलेला असतो व या फलकावर दुकानाची वेळ सुट्टीचा दिवस दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्ध नसल्याची ही बोंब होत आहे, धान्य पोच पावती ही मिळत नाही. रेशन दुकानदार लोकांना व्यवस्थित रित्या रेशन देतो की नाही यावर देखरेख करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या आदेशाने संबंधित अधिकाऱ्यांची भरारी पथक म्हणून नेमणूक करावी अशीही मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे मुखेड तालुका प्रमुख मन्मथ खंकरे यांनी मागणी केली आहे.. तसेच मुखेड तालुक्यातील अनेक शिधा पत्रिका धारकांना सुरळीत राशन मिळत नसल्याने अनेक गोर-गरीब जनता धान्यापासुन वंचित राहत आहेत. व काही गावातून स्वस्त धान्य दुकानदारा विषयी प्रहार जनशक्ती पक्षाकडे तक्रारी प्राप्त झाले आहेत याच अनुषंगाने या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा पुरवठा विभाग व तालुका पुरवठा विभागाने सखोल चौकशी करून संबंधित धान्य दुकानदारावर कठोर कारवाई करून स्वस्त धान्य दुकानदारांचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी प्रहारचे मुखेड तालुका प्रमुख मन्मथ खंकरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली...
COMMENTS