उमरी प्रतिनिधी-शेख आरीफ
उमरी:- नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने नांदेड जिल्हायातील 10 व 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उमरी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन उमरी भा.ज.पा.च्या वतीने माकेॅट कमेटी सभागृहात आज करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान पञ देऊन गौरव करण्यात आले.
यावेळी सुभाष देशमुख गोरठेकर, उपसभापती शिरीष देशमुख गोरठेकर, तालुकाध्यक्ष गणेश पा.गाढे, युवा नेते कैलासभाऊ देशमुख गोरठेकर, शहरध्यक्ष विष्णु पंडित,माजी उपनगरध्यक्ष प्रविणभाऊ सारडा,नगर अध्यक्ष प्रतिनिधी सदानंद खांडरे, ता.महिला अध्यक्ष विध्याताई आग्रवाल, जिल्हा महिला सरचिटणीस प्रेमलताताई आग्रवाल, सरिता मंञीवाड, गजानन श्रीरामवार,राजु पा.ढगे, शिवाजी हेमके,गंगाधर चिंताके, गजानन खांडरे,अमित पटकुटवार.आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS