------------
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
आज दि. २ रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आज मुक्रमाबाद मध्ये सर्व शेतकऱ्याचे वतीने पिक विमा व ओला दुष्काळ जाहीर करावा गोजेगाव सावळी पाझर तलावात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मावेजा मेळावा संदर्भात शेतकरी राष्ट्रीय महामार्गावर उतरले होते नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड तालुक्यात वरुणराजाने अकरा रूप धारण करून ढगफुटी झाली यामध्ये शेतकऱ्यांच्या हाती आलेले मुग ,उडीद तर गेलेच पण त्या पाठोपाठ सोयाबीनचे पीक सुद्धा मातीमोल झालं यामुळे शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारे सर्व पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला आहे शेतकऱ्यांसाठी एवढ्या नुकसानी नंतर शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विमा मिळावा म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरले होते .कृषिमंञ्याची गाडी अडवल्यानंतर कँबिनेट बैठकीत निर्णय झाला नसल्याने तालुक्यातील शेतकरी पुञांनी आंदोलन केले यावेळी आंदोलनाला छावणीचे स्वरुप आले होते.निवेदन स्विकारण्यासाठी नायब तहसिलदार महेश हांडे साहेब,पोलीस निरीक्षक कमलाकर गडीमे साहेब,तलाठी रातोळीकर साहेब आंदोलनस्थळी येवुन निवेदन स्विकारले.हक्काचा पीक विमा मिळाला नाही ओला दुष्काळ जाहीर नाही झाला लकरात लवकर पाझर तलावात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मावेजा नाही मिळाला तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन मुंबईला मंत्रालयात शेतकर्यांच्या वतीने करण्यात येईल असा इशारा बालाजी पाटील ढोसने मन्मथ भाऊ खंकरे ,बालाजी पाटील सांगवीकर या शेतकरी पुत्रांनी माननीय नायब तहसीलदार साहेब महेश हांडे साहेब , सहायक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे साहेब , तलाठी रातोळीकर साहेब यांना निवेदनाद्वारे रास्तारोको मध्ये मुक्रमाबाद येथे दिले. यावेळी दत्ता पाटील माळेगावे ,कैलास एसगे, नागनाथ बरले, कपिल पाटील ,दिगंबर पाटील ,रमेश झाडे, अविनाश पाटील व हजारो शेतकरी या आंदोलनात सहभाग नोंदवला होता या मोर्चाचे भारतीय जनता पार्टी मुक्रमाबाद च्या वतीने तसेच छावा संघटना च्या वतीने मानवाधिकार संघटना मुक्रमाबाद च्या वतीने तसेच प्रहार तालुका अध्यक्ष प्रहार संघटना मुखेड यांच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे....
COMMENTS