नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
..............................
कर्तव्यदक्ष समजले जाणारे तहसीलदार गजानन शिंदे नायगांव येथील तहसील प्रशासनाचा नुकताच पदभार स्वीकारला असून ते कर्तव्यदक्ष समजले जाणारे तहसीलदार गजानन शिंदे हे हिंगोली येथून नायगांव येथे रुजू झाले आहेत.
गजानन शिंदे हे यापूर्वी सुद्धा नायगांव येथे तहसिलदार म्हणून कार्यरत होते त्यांना नायगांव तालुक्याचे संपूर्णतः माहिती असून जनतेची त्यांची नाळ जुळलेली असल्यामुळे त्यांच्या कामाची कसोटी कर्तव्य पाहून पुन्हा नायगांव येथे तहसीलदार म्हणून यावे यासाठी राजकीय क्षेत्रातून लोकप्रतिनिधींची मागणी असल्यामुळे या ठिकाणी पुन्हा गजानन शिंदे हे पदभार स्वीकारले आहे यापूर्वी तहसीलदार म्हणून श्रीमती सुरेखा नांदे होते त्यांची बदली नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आहे.नुतन तहसीलदार शिंदे यांचा विविध स्तरातुन स्वागत करण्यात आले व भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या, आपल्या सन्मानाला पात्र राहील असेही यावेळी नूतन तहसीलदार गजानन शिंदे यांनी अनेककाशी बोलून दाखविले.
COMMENTS