आष्टी (दादासाहेब बन )महाराष्ट्र राज्य पोलीस सेवेमध्ये 36 वर्षे सेवा पूर्ण करून पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक या पदावरून नुकत्याच काही महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झालेले धोंडीराम माणीकराव झाडे व सौ शकुंतला धोंडीराम झाडे या दाम्पत्याने वाघेश्वरी देवस्थान वाघेबाभूळगाव या देवस्थानचे प्रवेश द्वार असलेल्या रस्त्यावर स्वखर्चातून भव्य अशी कमान उभा करून बाबुळगावच्या वैभवामध्ये भर घातली आहे. यावेळी सेवानिवृत्त धोंडीराम झाडे म्हणालेेे वाघेबाभूळगाव माझे मूळ गाव असून आपल्या गावाचे आपण काही देणे लागत असल्याकारणाने व मी या गावांमध्ये इयत्ता पहिली ते दहावी हे शिक्षण घेतले आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व आपल्या गावचे असलेले जागृत वाघेश्वरी देवस्थान च्या कृपेने मी पोलिस दलामध्ये रुजू झालो आणि कुठेही अडचण न येता पोलीस शिपाई या पदापासून ते पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक या पदापर्यंत जाऊन छत्तीस वर्ष कसलीही अडचण न येता काम करून जनतेची सेवा केली. विशेषता कोरोना सारख्या गंभीर महामारी मध्ये चौक बंदोबस्ताचे काम केले. या सर्व गोष्टी व हे कार्य आपल्या गावचे जागृत देवस्थान असलेले वाघेश्वरी देवीच्या कृपाशीर्वादाने मी करू शकलो म्हणून मी व माझी पत्नी आज या ठिकाणी येऊन आपल्या गावाचे ऋण व्यक्त करण्यासाठी स्वखर्चातून मंदिराकडे जात असलेल्या रस्त्यावर ही कमान वेस उभी केली आहे .यापुढेही मी या गावाच्या विविध कामासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे .नोकरीनिमित्त मी बाहेरगावी जरी असलो तरीही या गावावरचे प्रेम मी कदापि विसरणार नाही असे विचार धोंडीराम झाडे यांनी यावेळी व्यक्त केले .त्यांच्या या कार्याचे वाघेबाभूळगाव ग्रामस्थांनी मोठ्या थाटामाटात स्वागत करून सपत्नीक सत्कार केला. यावेळी गावचे सरपंच वाघ , माजी उपसरपंच लिंबराज वाघ, परम मित्र विलास मेसे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
सेवानिवृत्त स.पो.उपनिरीक्षक धोंडीराम झाडे यांच्या वतीने वाघेश्वरी देवस्थान वाघेबाभूळगाव येथे स्वखर्चाने उभा केली देवस्थान प्रवेशद्वार कमान वेस
आष्टी (दादासाहेब बन )महाराष्ट्र राज्य पोलीस सेवेमध्ये 36 वर्षे सेवा पूर्ण करून पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक या पदावरून नुकत्याच काही महिन्यापूर्...
By admin
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड (विशेष प्रतिनिधी): नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेले व सध्या नांदेड शहरातील वामननगर परिसरातील रवींद्र प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून ...
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड (विशेष प्रतिनिधी): नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेले व सध्या नांदेड शहरातील वामननगर परिसरातील रवींद्र प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून ...
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
-
'मला उंच उडू दे' हा एकनाथ आव्हाड यांच्या नाट्यछटांचा पहिला संग्रह जे. के. मीडियाच्या ज्योती कपिले यांनी २०१७मध्ये प्रकाशित केला आह...
-
परभणी: परभणीच्या क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राचा भक्कम पाठीराखा, उत्कृष्ट संघटक व हजारो खेळाडूंचे भवितव्य घडवणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व प्रा....
COMMENTS