उमरी प्रतिनिधी -शेख आरीफ
उमरी:- उगीच स्वार्थासाठी राजकारण करून नावे ठेवण्यापेक्षा विरोधकानी शेतकऱ्याच्या हिताचे कामे करून दाखवावे नाव न घेता विरोधकावर राजकीय तोफ डागत शेतकऱ्याना सिंधी व वाघलवाडा क्षेञातील शेतकऱ्याना दुजाभाव न करता योग्य पद्धतीने ऊस लागवड केल्यास पश्चिम महाराष्ट्राचे उत्पादनाचे भाव देवून सहकार्य करणार असल्याचे अव्हाण एम .व्ही .पी .के वाघलवाडा साखर कारखान्याचे चेअरमन प्रथम बॉयलर प्रतिपादन करते वेळेस अध्यक्षीय समारोपात बोलत होते .यावेळी प्रथम बॉयलर प्रतिपुजन साधूसंत महंत याच्या हस्ते पुजन होवून बॉयलर पेटविण्यात आले त्यानंतर कै . वामनराव पै याच्या प्रार्थनेने पुढील सभेला सुरुवात झाली . यावेळी साधू संत
यदुबन महाराज कोलंबी , अंनत महाराज बेलगावकर चाकूर , रामभारती महाराज मोहनपूर , साईनाथ महाराज बितनाळकर (वसमतकर ) , कपाटे महाराज बिजेगाव , होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी , संजय कुलकर्णी , पांडूरंग देशमुख गोरठेकर , तहसीलदार माधव बोथीकर , संदिप पा .कवळे , जगन शेळके , प्रल्हाद पा .इज्जतगावकर, एकनाथ मोरे (मंत्रालय मुंबई ), सतिश पिंगलवाड , दत्ताहरी पा. चोळाखेकर , लिंगराम पा . कवळे , बापुराव पा . करकाळेकर , धनराज पाटील , विजयअप्पा उतरवार , प्रभू पा . पुयड , माधवराव पा . नागठाणेकर , गणपतराव पाटील नांदेकर , सुभाष पेरेवार , साहेबराव पाटील शिंदे , गणेश पा . कौडगावकर , मलिकाअर्जून चंदापूरे, प्रकाश पाटील वसमतकर , गणेश पा . कवळे , माधवराव पा . बोडके , गोंविदअप्पा नलबलवार , नरसिगं मुक्कावार , गोंविदराव पा . सिंधीकर , प्रशांत उतरवार , बालाजी पा. सुर्यवंशी बितनाळकर ,
अंबटवार , शेख रफिक , नागनाथ पांचाळ , कृषी अधिकारी पवार , आदी सह नायगाव , धर्माबाद , उमरी , भोकर , परिसरातील ऊसउत्पाद शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
पुढे कवळे गुरुजी म्हणाले शेतकऱ्याच्या हितासाठीच सिंधी व वाघलवाडा कारखाना उभा केला आहे . यामध्ये राजकरण व कोणताही भेद भाव स्वार्थ नाही . विरोधक हे शेतकऱ्याच्या हिताचेसाठी कांहीच करू शकले नाहीत . मी सामान्य शेतकऱ्याचा पोरग आहे . मला शेतकऱ्याच्या व्यथा माहीत आहेत . शेतकऱ्यानी कुंटूंबीक विचार केल्यास राजकारणाकडे अधिक महत्व न देता शेती विषय जोडधंदा आणी उत्कृष्ट शेती करावी असा ही सल्ला वाघलवाडा साखर कारखाण्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरूजीनी मोलाचा सल्ला शेतकऱ्याना दिला आहे . यापुढे गुरुजी म्हणाले समाजीक कार्य पेक्षा राजकारण मोठे नाही . राजकारण जनतेच्या विकासाचे झाले पाहीजे आज मी शेतकऱ्याच्या हितासाठी साखर कारखाना उभारला त्यात कोणतेही राजकारण नाही सर्व जनहितासाठीच आहे आज या मंचावर सर्वच पक्षाचे राजकीय नेते उपस्थित आहेत हे कशाचे घोतक आहे . केवळ मानुसकी हाच ध्येय आहे राजकारण करा पण ते राजकारण ठिकाणी मी कारखाने उभारले जनसेसाठी ; तुम्ही कारखाने उभा करून शेतकर्याचे माझ्या पेक्षा कमी ऊसाला भाव देवून अशी विकासाची स्पर्धा करून दाखवावी उगीज समाजाच्या लोकावर डोळे काढीत असाल तर ही जनता माय - बाप तुम्हाला कधी माफ करणार नाही . ते येणाऱ्या काळात ठरवेल पण गुरुजीनी प्रथमच ठणकावून भाषन केल्याने पुन्हा एकदा उमरी तालुक्यात गोड ऊसाच्या बॉयलर सोबत राजकीय बॉयलर पेटणार आहे असे चित्र दिसून आले आहे . गुरुजीची भविष्यवाणी आता शेतकऱ्याच्या हिता सोबत राजकीय पुढील वाटचालीचे बिबं पुढे आले आहे . सध्या तरी कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव न विरोधकारवर शालीतून जोडे मारले आहेत . मात्र कवळे गुरुजीचा आक्रमक पवित्रा हा राजकीय ठेवा व शेतकऱ्यासाठी सध्या तरी मेवा ठरला आहे . अखेर कवळे गुरुजीनी पुन्हा पुन्हा विरोद्धकाना अव्हाण केले आले . विकासात्मक राजकारण करा ... जनता तुम्हाला माफ करणार नाही सज्जड सल्ला गर्व न करता केला आहे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यु . सी . कदम तर साईनाथ सावंत यांनी आभार मानले.
COMMENTS