केज दि १५(प्रतिनिधी) तालुक्यातील आनंदगाव येथील रहिवासी प्रा आबासाहेब बब्रुवान गायकवाड यांना राज्यशास्त्र विषयात डॉ बाबासाहेब आंबेडकर ...
केज दि १५(प्रतिनिधी)
तालुक्यातील आनंदगाव येथील रहिवासी
प्रा आबासाहेब बब्रुवान गायकवाड यांना राज्यशास्त्र विषयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून पीएच डी पदवी प्रदान करण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघटनेचे पर्यावरण विषयक धोरण एक चिकित्सक अभ्यास या विषयावर त्यांनी संशोधन पूर्ण केले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कार्यरत असलेले प्रा डॉ बी एस वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण केले. या यशाबद्दल त्यांचे प्राचार्य एच बी सौदागर,प्रा डॉ अनिल गायकवाड आदींनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS