केज! प्रतिनिधी
*विडा गटात शनिवारी अचानक आलेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करूण नुकसान भरपाई देण्याची मागणी विडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी केली आहे.*
*केज तालुक्यातील विडा गटातील विडा,कोरडेवाडी,बेंगळवाडी,बुरंडवाडी यासह अन्य भागात शनिवारी दुपारी 4 च्या दरम्यान अचानक आलेल्या परतीच्या वादळी पावसामुळे शेतकर्यांनी काबाडकष्ट करूण पिकलेल्या सोयाबीन,कापूस,बाजरी,ऊस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची ऐवढी मोठी दाहखता होती की प्रत्यक्ष पिके व मोठ-मोठे झाडे भूईसपाट झाले आसून महाविरणाचे देखिल मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.त्यामुळे सदरील नुकसान ग्रस्त भागातील नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी केली आहे.*
COMMENTS