परळी( प्रतिनिधी) दि. 2 ऑक्टोबर तालुक्यातील कन्हैया आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे युवा बीड जिल...
परळी( प्रतिनिधी) दि. 2 ऑक्टोबर तालुक्यातील कन्हैया आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे युवा बीड जिल्हाध्यक्ष भागवताचार्य, रामायणाचार्य आणि महाराष्ट्रातील प्रसिध्द किर्तनकार गोविंद महाराज मुंडे यांचे किर्तन शेमारू मराठीबाणा या मराठी चॅनेलवर आनंदवारी किर्तनाची या कार्यक्रमात दि. 4,5,6 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेत आयोजित केले आहे. सदरील किर्तानाचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री, श्री.ह.भ.प.भागवताचार्य सच्चिदानंद महाराज गित्ते, श्री.ह.भ.प बंडोपंत महाराज ढाकणे गुरूजी श्री.ह.भ.प भागवताचार्य राम महाराज मुंडे गोपीनाथ गड यांनी केले आहे.
COMMENTS