*
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
मुखेड तालुक्यात शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी आलेल्या मंञ्या समोर आक्रमक स्वरुपात बांजु मांडल्याने जास्तीच जिव्हारी लागल्याने माजी आमदार सुभाष साबणे यांनी शेतकरी पुञांना राजकीय नख्खे स्टंटबाज म्हणुन टिका केली होती या टिकेला ऊत्तर देताना शेतकरी पुञ बालाजी पाटील सांगवीकर यांनी साबणे यांना प्रतिऊत्तर दिले की आपण मुखेड कडे लक्ष न देता आपण देगलुर बिलोलीत दुसर्या फळीतील किती कार्यकर्ते तयार केलोत व आपला शिवसेना पक्ष देगलुरात राष्ट्रवादी व बिलोलीत भाजपच्या दावणीला बांधलोत यांचे आत्मपरीक्षण करुण स्थानिक स्वराज्य संस्थेत किती पक्षाचे प्रतिनिधी आणलो अशी सणसणीत टिका सांगवीकर यांनी केली.शेतकरी पुञाच्या आंदोलनाला स्टंटबाजी म्हणता तर आपण आमदार झालेला सर्व इतिहास जनतेला माहीत असुन शेतकर्यांच्या पोरांची माथी भडकुन शेतकर्यांच्या जिवावर आमदार झालेल्या साबणे साहेबांनी शेतकर्याबद्दल बोलु नये अशी जहरी टिका सांगवीकर यांनी केली.शेवटी नामदार होयायचे माजी का झालोत यांचेही आत्मपरीक्षण करावे असेही सांगवीकर म्हणाले.
COMMENTS