-------------------------------------------------
केज दि 22 (प्रतिनिधी ):- तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले असून अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाल्या मुळे सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी ५०,००० रुपये टाकावे या व इतर मागण्यासाठी दि 22ऑक्टोबर रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपोषण सुरू केले आहे
बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे शेकऱ्यांच्या सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
मागील दोन – चार वर्षापासून पावसाचे पर्जन्यमान कमी असल्याने पिकांचे उत्पादन घटले आहे व बोगस बियाण्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त होता. त्यातच मागील सात महिन्यापासून कोरोनाच्या प्रभावामुळे शेतमालाला बाजार भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले या हंगामामध्ये पिके चांगली आली होती. परंतु अतिवृष्टीमुळे सर्व पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडून हवालदिल झाला आहे. यामुळे शासनाने पंचनामे न करता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत म्हणून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी.
तसेच पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश पिक विमा कंपन्यांना द्यावेद व शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यात यावी. तसेच पिक कर्जापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज माफीचा लाभ देण्यात येऊन, त्यांना नवीन पिक कर्ज देण्यात यावे. नवीन पिक कर्ज अर्जदार शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करण्यात यावे. या मागणीसाठी केज तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रवीण ठोंबरे, जिल्हा सचिव विलास गुंठाळ,तालुका अध्यक्ष राहुल खोडसे, वीर भगत सिंह विद्यार्थी परिषद जिल्हा अध्यक्ष योगेश अंबाड,तालुका अध्यक्ष विशाल देशमुख,छावा जिल्हा अध्यक्ष शिवाजी ठोंबरे, संभाजी ब्रिगेड चे शशिकांत इंगळे,संजय तपसे,गजानन अंबाड,प्रवीण खोडसे,विष्णू आबा थोरात,संदीप शितोळे,ऋषिकेश गलांडे,हर्षवर्धन खोडसे, संदीप थोरात, शरद खोडसे,धीरज खोडसे,शेखर थोरात,अप्पासाहेब खोडसे,दयानंद करपे,युवराज मगर,धर्मराज सोळंके,पत्रकार दत्तात्रय मुजमुले, आदी उपस्थित होते.
COMMENTS