नायगांव ( प्रतिनिधी )
सामाजिक विचारांचा बाणा असलेले जनता हायस्कूल नायगांव येथील सेवानिवृत्त शिक्षक किशन माधवराव भालेराव यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांना लसाकम शाखेच्या वतीने ब्लु ब्लेस इंग्लिश स्कूल येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.
सुख आणि दुख येणे व जाणे प्रत्येक क्षणा मधील बदल आहेत आयुष्यात ते येतच राहतील पण समाजाला वेळोवेळी आठवण येणारे दिवगंत कि.मा. भालेराव, श्रीमती देऊबाई मेटकर, संभाजी जमदाडे हे काळाच्या पडद्याआड गेल्याने त्यांना लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने शहरातील ब्लु ब्लेस इंग्लिश स्कूल येथे त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर प्रथम प्रस्ताविक लसाकम तालुका सचिव भीमराव बैलके यांनी केले तर प्रा. डॉ. के हरिबाबु, डॉ. शंकर गड्डमवार, कॉम्रेड देवराव आईलवार, नगराध्यक्ष शरद भालेराव ,लसाकमचे वरिष्ठ रवींद्र भालेराव, इंजि. रघुनाथ वाघमारे, मल्हाराव तोटरे, कैलास भालेराव, पत्रकार पंडित वाघमारे, उत्तम गायकवाड यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केली.
यावेळी डॉ. प्रभाकर गायकवाड, गणपत भालेराव, माणिक पा. चव्हाण, दयानंद भालेराव, गंगाधर कोतेवार, खयुम खुरेशी, नागोराव झुंजारे, शंकर गायकवाड, विजय द्रोणाचार्य, दिगंबर झुंजारे, प्रकाश भालेराव, गंगाधर वाघमारे, देवकरे, संकल्प जमदाडे आदींची उपस्थिती होती तर या श्रद्धांजली कार्यक्रमाचे संचलन शाहीर माधव बैलकवाड यांनी केले तर आभार प्रा. संजय भालेराव यांनी मानले.
COMMENTS