*
*केज प्रतिनिधी*
केज-उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे दलित कुटुंबातील मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्त्या करण्यात आली ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे.सध्या आशा प्रकारच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे.त्यातच उत्तरप्रदेशातील पोलीस प्रशासनाची तपासणी ही संभ्रमाची आहे ते सरकारच्या दडपनाखाली प्रशासन काम करत असल्यामुळे आरोपींना ते पाठीशी घालत आहेत त्यावरून यूपी सरकार आरोपींना पाठराखण करत असल्याचे दिसून येते आहे आणि ही बाब नीच पणाची आहे म्हणून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी जेणे करून भविष्यात असा गुन्हा करताना हजार दा विचार करतील आणि असे प्रकार होणार नाहीत व वाढत्या अन्याय अत्याचाराला आळा बसेल म्हणून आरोपींना फाशीची शिक्षा करून पीडित मुलीला न्याय मिळवून द्यावा.आशा मागणीचे निवेदन छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांनी केले आहे.निवेनदावर प्रवीण खोडसे,हमीद शेख,पत्रकार रणजित घाडगे यांच्या स्वाक्षरी आहेत.
COMMENTS