केज (प्रतिनिधी )
कोरोना सारख्या महाभयंकर रोगराई शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे मराठवाड्यात अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली हाताला आलेले पीक गेली आणि प्रशासन काहीच पावलं उचलत नसल्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्या समोर 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 2 वाजता निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती भाई मोहन गुंड यांनी दिली,
या वर्षी मराठवाड्यात सर्व ठिकाणी पावसाने नेमक्या सोयाबीन मूग उडीद ईतर पीक काढणीच्या वेळेला मराठवाड्यात पावसाने कहर केला आणि सर्व पीक पाण्याखाली गेले तसेच तर काई पीक जाग्यावर उगवले आहेत कोरोनात भयंकर रोगराईत अतिवृष्टी या संकटांनी शेतकरी हैराण झालेले आहेत शेतकरी आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे शेतकरी हतबल झालेला आहे अश्यावेळी सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 रु मदत जाहीर करावी
तसेच शेतकरी विरोधी मंजूर झालेले विधयके महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात लागू करू नयेत यासह
कापसाला किमान आठ हजार रुपये हमीभाव द्या
मराठवाड्यातील कारखान्यांनी उसाला एफआरपी प्रमाणे भाव द्यावा,नव्याने केलेले कृषी विषयक कायदे रद्द करावेत कांद्याची निर्यात बंदी तात्काळ हमीभाव संरक्षण यंत्रणा उभी करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे तरी मराठवाड्यातील सर्व प्रमुख पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत अशी माहीती शेकापचे राज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई मोहन गुंड व अॅड नारायण गोले पाटील यांनी दिली
COMMENTS