माजलगाव/प्रतिनिधी
माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद रिक्त झाल्यामुळे त्या जागेवर दि. 5 ऑक्टोबर सभापती संभाजी शेजुळ यांना आ सोळंके नी संधी दिली तर उपसभापती सौ लता अच्युत लाटे यांची लॉटरी लागली अशोकडक, जयशिंह सोळंके यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली आहे.
अशोक डक यांची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी वर्णी लागल्यामुळे माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद रिक्त झाले होते तर उपसभापती निळकंठ भोसले यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षांतर केल्या मुळे उपसभापती पद रिक्त झाले होते.दि. 5 ऑक्टोबर रोजी सभापती पदाची निवडी साठी कृउबा कार्यालयात आज दुपारी 1 वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत ही निवड करण्यात आली. माजलगाव विधानसभा मतदारसंघा चे आमदार प्रकाश सोळंके यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती संभाजी शेजुळ व उपसभापती सौ लता लाटे यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून निबंधक कार्यालयातील व्ही एल पोतंगले यांनी काम पाहिले त्यांना सचिव हरिभाऊ सवणे यांनी मदत केली
COMMENTS