______________
केज प्रतिनिधी. तालुक्यातील आनंदगाव (सा) येथील प्रयोगशील शेतकऱ्याची फुलझाडांची रोपे विक्री करणाऱ्या मे किमया बायोटेक प्रा लि कंपनीकडून निकृष्ठ दर्जाची रोपे देऊन फसवणूक केलीअसल्याची लेखी तक्रार करण्यात आली आहे कृषी विभागाने पाहणी करून नुकसान झाल्याचा अहवाल सादर करूनही नुकसान भरपाई न मिळाल्याने रोपे विक्रेत्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस ठाण्यात, सहायक पोलिस निरीक्षक युसूफवडगाव यांच्याकडे करण्यात आली आहे.तात्काळ गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी विजयसिंह गायकवाड यांनी केली आहे.
तालुक्यातील आनंदगाव (सा) येथील प्रयोगशील शेतकरी विजयसिंह गायकवाड यांनी पारंपरिक पद्धतीने शेती परवडत नसल्याने फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शेतात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत वीस गुंठे क्षेत्रावर हरितगृहाची उभारणी केली. यामध्ये फुलशेती करण्याकरिता किमया बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून चार लाख बाहत्तर हजार पाचशे रूपये किंमतीच्या जरबेरा फुलांची नऊ प्रकारच्या वाणाच्या फुलझाडांची तेरा हजार पाचशे रोपे खरेदी करून मार्च-२०१८ मध्ये लागवड केली. रोपे पुरवठादार कंपनीच्या मार्गदर्शनाखाली त्या रोपांना खतांची मात्रा व किटकनाशक फवारणी वेळेत केले .परंतु बोगस रोपे असल्याने त्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने उपविभागीय कृषी कार्यालयाकडे आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर कृषी विभागाच्या समितीने प्रत्यक्ष फुलशेतीला भेट देऊन स्थळ पंचनामा करून रोपे बोगस व निकृष्ट असल्याने शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान होऊन उत्पादनात 80 टक्के पर्यंत घट झाल्याचा लेखी अहवाल शेतकऱ्यांना दिला. याबाबत वेळोवेळी कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केलीअसल्याने कंपनीचा फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत कंपनीच्या व्यवस्थापनाशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
--------
फसवणूक करणाऱ्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई देण्यात यावी.
विजयसिंह गायकवाड
तक्र
COMMENTS