धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद येथे हंगाम 2020-21 साठी सी. सी.आय. खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धर्माबाद तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय कावड़े यानी भारतीय कापूस निगम चे महाप्रबंधक यांना ईमेल द्वारे निवेदन पाठविले आहे. श्री कावड़े ने निवेदनात पुढे असे सांगितले की 2019-20 मध्ये धर्माबाद च्या कापूस खरेदी केंद्रावर भारतीय कापूस खरेदी केंद्राकडून कापूस खरेदी करण्यात आला होता.त्यामुळे लॉकडाउनच्या काळात दिलासा मिळाला होता.धर्माबाद येथील मागील वर्षी अंदाजे 94466.25 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला होता व ह्यवर्षी कपासीचे पिक साधारणकारक आहे. धर्माबाद तालुक्यातील तीन जिनिंग प्रेस यूनिट असून रोज 1000 बेल्स प्रोडक्शन कैपेसिटी असलेल्या धर्माबाद केन्द्रला शेतकऱ्यांच्या अधिक कापूस खरेदीचा विचार करुन व रोज 5000 क्विंटल कापूस खरेदी करण्याचा टारगेट असल्यास धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचे सी.सी. आय. मार्फ़त रोज 5000 क्विंटल कापूस खरेदी केल्यासही त्या खरेदी केलेल्या मालाचे रोजच्या रोज बेल्स बनवण्याची क्षमता असलेल्या धर्माबाद कापूस खरेदी केन्द्राची टेंडर प्रक्रीया लवकर काढून धर्माबाद येथील शेतकऱ्यांना ह्यवर्षी वाढ़ीव आधारभूत किमतीचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी भारतीय कपास निगम लि. कडून येथील कापूस केंद्रासाठी टेंडर प्रक्रिया येत्या आठ दिवसात काढून शेतकऱ्याचें कापूस ह्यवर्षी दसऱ्यापासून खरेदीस प्रारंभ करावे.अशी आग्रहाची विनंती श्री कावड़े यांनी केली आहे व ह्या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना ही पाठवन्यात आले आहे. ह्या ईमेल ची मुख्यमंत्री यांनी लगेच दखल घेऊन हे ईमेल पुढील कार्यवाहीसाठी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागला पाठविन्यात आले आहे.
COMMENTS