राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )धनगर समाजाचा अनूसूचित जमातीत समावेश करून सवलती देण्याच्या मागणीसाठी दि.25 सप्टें.रोजी ढोल बजावसह विविध प्रकारचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.त्याच अनुषंगाने धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार माहूर यांचे मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
समाज संघर्ष समितीने गेल्या कित्येक वर्षा पूर्वी पासून राज्यातील धनगर समाजाला अनूसूचित जमातीचा दर्जा व सवलती देण्याच्या मागणीकडे सरकारने कायम दुर्लक्ष केल्याने त्या समाजात असंतोष उफाळून आला असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.या निवेदनावर निळकंठ मस्के,विलास गावंडे,सुभाष लकडे,संतोष हिंगाडे,शरद भडंगे,राजू सौंदलकर,अनिल महल्ले,प्रवीण मार्कंड,संतोष महल्ले,भारत गावंडे,साहेबराव पांढरे,गजानन भरकड,आकाश ढोरे,सूरज कोरके,नरेश घोरपडे,अंकुश डोळस,दिगंबर घोरपडे,आकाश कोरके,साहेबराव महल्ले,विष्णु पावडे,राजू घोरपडे,नितेश महल्ले यांचेसह अनेक समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.प्रशासनाच्या वतीने नायाब तहसीलदार व्ही.टी.गोविंदवार यांनी निवेदन स्वीकारले.
COMMENTS