केज/ प्रतिनिधी : प्रकाश मुंडे :- भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची काल घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील लोकनेत्या पंकजा मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी निवड करण्यात आली. स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या नंतर बीड जिल्ह्याला मिळालेला हा बहुमान आहे. प्रमोद महाजन हे पंकजा मुंडे यांचे मामा होते. मामा नंतर भाचीला हे पद मिळाले आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये सचिव पदाला मोठे महत्त्व आहे. या पदावर निवड झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ग्रहमंत्री अमित शाह व राष्ट्रीय अध्यक्ष जे. पि. नड्डा यांचे आभार मानले आहेत. केज शहरात पंकजा मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी निवड झाल्यानंतर फटाके व तोफा फोडून त्यांच्या निवडीचे स्वागत भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते व बीड जिल्ह्या भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर, तांबव्याचे सरपंच सदाशिव चाटे, अनिल सूर्यवंशी, सदाशिव भालेकर व ईतर अनेक कार्यक्रत्यांनी केले. पंकजा मुंडे यांच्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी निवड झाल्यानंतर बीड जिल्ह्यातही आनंद व्यक्त केला जातो आहे.
COMMENTS