राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )उत्तर प्रदेशातील मथुरा नगरीत जन्म घेतलेल्या पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी संघाच्या जडणघडणीसह सामाजिक कार्यात दिलेले योगदान कायम प्रेरणादायीं असून त्यांचे महान योगदान लक्षात घेवूनच त्यांचेवर प्रथम महासचिव व नंतर संघ प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय आमले यांनी दिली. तालुका भाजपाने दि.25 सप्टें.रोजी स. ठीक 11वा. स्थानिक भाजपा कार्यालयात त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून अभिवादन करतांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष अॅड.दिनेश येऊतकर,अनिल वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त त्यांचे जीवन चरीत्रावर अॅड.येऊतकर,जोतिराम राठोड, अनिल वाघमारे यांनी प्रकाश टाकला.यावेळी रामकृष्ण जायभाये, ज्ञानेश्वर लाड,बंसगोपाल अग्रहारी,कैलास मोहुर्ले,राजु दराडे,संजय बनसोडे,सुनील बोळे,रामकिसन केंद्रे,कैलास फड,सोनू तोडसाम,पद्मजा गिर्हे यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्तावीक तालुका सरचिटणीस निळकंठ मस्के यांनी केले.सूत्रसंचलन संजय पेंदोर यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद सोनकर यांनी केले.
COMMENTS