वडवणी येथील सुप्रसिध्द व्यापारी विश्वासराव आसलकर यांचे दुःखद निधन.

  वस्त्रोद्योग क्षेत्रातील 'कोहिनूर हिरा' काळाच्या पडद्याआड.   वडवणी /जगदीश गोरे  वडवणी शहरातील सुप्रसिध्द कापड व्यापारी विश्वासराव ...


 


वस्त्रोद्योग क्षेत्रातील 'कोहिनूर हिरा' काळाच्या पडद्याआड.


 


वडवणी /जगदीश गोरे


 वडवणी शहरातील सुप्रसिध्द कापड व्यापारी विश्वासराव नाथराव आसलकर उर्फ बाप्पु यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी उपचारादरम्यान औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात परवा दि.२३ बुधवार रोजी रात्री ११:३० वा.च्या सुमारास दुःखद निधन झाले. दरम्यान वस्त्रोद्योग क्षेत्रातील कोहिनूर हिरा काळाच्या पडद्याआड गेल्याने समस्त वडवणीकरांवर शोककळा पसरली असून गुरुवार रोजी वडवणी शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून सर्व व्यापारी बांधवांनी दिवंगत विश्वासराव आसलकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. 


                 याबाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण मराठवाड्यात नामांकित असलेल्या वस्त्रनगरी वडवणी येथील सुप्रसिध्द माऊली सिलेक्शनचे मालक तथा दानशूर व्यक्तिमत्व व वडवणीच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील कोहिनूर हिरा म्हणून ज्यांना संबोधले जायचे असे विश्वासराव नाथराव आसलकर उर्फ बाप्पु यांचे परवा दिनांक २३ सप्टेंबर २०२० बुधवार रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास वयाच्या ५३ व्या वर्षी उपचारादरम्यान औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र तीन दिवसांपूर्वी प्रकृती जास्तच खालावल्याने त्यांचे शरीर वैद्यकीय उपचारास प्रतिसाद देत नव्हते. यातच त्यांची परवा प्राणज्योत मालवली. त्यांच्या या अशा अकाली निधनामुळे वस्त्रोद्योग क्षेत्र तसेच संपूर्ण वडवणी तालुक्यावर व कौटुंबिक स्नेही तसेच हितचिंतकांवर खुप मोठ्ठी शोककळा पसरली असून काल दि.२४ गुरुवार रोजी सकाळी औरंगाबाद येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर कुटूंबातील सदस्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात कुटुंबांमध्ये वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा मोठा परिवार असून आसलकर कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात दैनिक परिवार सहभागी आहे. साधारणपणे ३० वर्षांपूर्वी वडवणी शहरात येऊन याठिकाणी वस्त्रोद्योगाचे साम्राज्य उभारुन अगदी शून्यातून मोठ्या विश्वाची निर्मिती करणारा हा वस्त्रोद्योग क्षेत्रातील कोहिनूर हिरा काळाच्या पडद्याआड गेल्याने समस्त वडवणीकरांवर शोककळा पसरली असून गुरुवार रोजी वडवणी शहरातील कापड, रेडीमेड ड्रेसेस, सराफा, किराणा, डॉक्टर्स, मेडिकल, जनरल स्टोअर्स, हॉटेल, इलेक्ट्रीक-इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, झेरॉक्स सेंटर, ऑनलाईन सेंटर, फळभाजी यांसह सर्वच व्यवसाय व संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून सर्व व्यापारी बांधवांनी दिवंगत विश्वासराव आसलकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group