मुखेड (विठ्ठल कल्याणपाड )
धनगर समाजास घटनेने आरक्षण बहाल करुण देखील गेल्या अनेक वर्षासून अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी न केल्याने तात्काळ करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दि.२८ सप्टेंबर रोजी धनगर समाज बांधवांच्याव वतीने तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
गेल्या ५० वर्षापासून सर्वच सरकारने धनगर समजास अनुसूची जमातीचे आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन निवडून आले पण आरक्षण न दिल्याने धनगर समाज बांधवाची घोर निराशा झाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंढरपुर येथील एका जाहिर सभेत विठ्ठलाच्या साक्षीने आरक्षणाची अंमलबजावणी बाबत व्यक्तव्य केले होते पण अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या योजनेअंतर्गंत १ हजार कोटी रुपयांचा निधी दयावा,शेळी मेंढी विकास महामंडळास पाचशे कोटी रुपयाचे भांडवल दयावे,मुंबई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवीह होळकर येथे स्मारक उभारावे, शेळया मेंढया चरण्यासाठी गायरान जमीन उपलब्ध करुन दयावे, मेंढपाळांना संरक्षण दयावे अशा विविध मागण्या घेऊन निवेदन सादर केले.
तरी मुख्यमंत्री उध्ववजी ठाकरे यांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील या अशा पोटी धनगर समाज बांधवांच्या अशा पल्लवीत झाले आहेत. यावेळी भाऊसाहेब पाटील मंडलापुर,अशोक पाटील रावीकर, व्यंकटराव दबडे, डॉ.श्रीरामे बालाजी पाटील सकनुरकर, कल्याणकराव पाटील आखरगेकर,मारोती आमनर, पांडु पाटील वडेर, माधवराव पाटील, पिंटु पाटील, शिवराज पाटील, लक्ष्मण कोळेकर आदी समाज बांधवांची उपस्थित होती.
COMMENTS