गंगाखेड -2001 साली नगरपालिकेने अमानत रक्कम घेऊन अधिकृतरित्या बांधून दिलेले व्यावसायिक गाळे विकास कामाच्या नावाखाली हटवू नये या मागणीसाठी 'त्या' 95 गाळेधारकांचे दुसऱ्या दिवशी बुधवारी भर पावसातही उपोषण सुरूच होते.
नगरपालिकेने 2001साली बस स्थानकाच्या बाजूला रिकाम्या जागेत टिन पत्राचे शेड छोट्या व्यावसायिकांना बांधून दिले.यापोटी पालिकेने प्रत्येक दुकानदाराला .10000 रू अमानत रक्कम घेतली होती. या दुकानास तीनशे रुपये महिना प्रमाणे भाडेही आकारण्यात येत होते. 2017 पासून पालिकेने भाडे स्वीकारणे बंद करत बांधकाम विभागाच्या मदतीने गाळेधारकांना नोटीस दिल्या. जागा मोकळी करून देण्याचे सांगितले. त्यानंतर काल मंगळवारी नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त विद्यमाने लाऊडस्पीकर द्वारे या दुकानाच्या जागी त येऊन ती दुकाने उद्या सकाळपर्यंत खाली करा नसता जेसीबी द्वारे खाली करण्यात येतील असे आव्हान केले .त्यानंतर घाबरलेल्या दुकानदारांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता व्यापारी संकुल असलेल्या ठिकाणी बसस्थानकासमोर उपोषणास प्रारंभ केला .आज बुधवारी दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत भर पावसातही त्यांचे उपोषण सुरूच होते.
*मान्यवरांकडून भेटी विचारपूस*
गाळेधारक उपोषणाला बसल्याचे कळताच मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम ,तालुकाध्यक्ष कृष्णा सोळंके यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली ,आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे शहराध्यक्ष इंतेसार सिद्दीकी यांनी उपोषणला पाठिंबा असल्याचे जाहीर केले .सामाजिक कार्यकर्ते गौतम रोहिणकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव ,नगरसेवक सुनील चौधरी ,जयवंत कुंडगीर राम भंडारे,,संतोष मुरकुटे मित्र मंडळ इस्माईलभाई ,समाजवादी पार्टी उस्मानभाई, धनगर साम्राज्य सेना,mim अझरोदिन, माऊली जाधव,आदिच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट उपोषणकर्त्यांना आपला पाठिंबा व्यक्त केला. पोलीस ठाणेदार शेख यांनी उपोषण स्थळाची पाहणी केली.
COMMENTS