राज्य शासनाने धनगर समाज एस.टी.च्या आरक्षणाची तात्काळ आमलंबजावणी करावी

  धनगर समाजाच्या वतिने माजलगाव तहसील समोर ढोल बजाओ आंदोलन   माजलगाव/प्रतिनिधी       धनगर आरक्षण कुती समिती, धनगर साम्राज्य सेना व मल्हार सेन...


 


धनगर समाजाच्या वतिने माजलगाव तहसील समोर ढोल बजाओ आंदोलन


 


माजलगाव/प्रतिनिधी 


    धनगर आरक्षण कुती समिती, धनगर साम्राज्य सेना व मल्हार सेनेच्या वतिने धनगर समाजाच्या एस.टी.च्या आरक्षणाची राज्य शासनाने तात्काळ आमलंबजावणी करण्याच्या मागणीसाठी माजलगाव तहसील कार्यालयासमोर दि २५ सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी ११:०० प्रंचड घोषणाबाजी करत ढोल बजाओ आंदोलन करुन निवेदन देण्यात आले. 


 


धनगर आरक्षण कुती समिती,धनगर साम्राज्य सेना व मल्हार सेनेच्या वतिने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की, गेल्या ७० वर्षांपासून धनगर समाजाला आपल्या हाक्काच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणा पासुन वंचित ठेवण्यात आले आहे, भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही धनगर समाजाचे सामाजिक, राजकीय व शौक्षणीक कुठलीही प्रगती झालेली नाही, त्यामुळे डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमध्ये दिलेल्या आरक्षणात धनगर समाजाला अनुसूचित जमाती परिशीष्ट ३६ क्रांमकावर धनगड अँन्ड ओरन हा शब्द हिंदी आहे, धनगड हि जात महराष्ट्रात अस्तित्वात नसुन धनगर जात अस्तित्वात आहे. धनगर हा शब्द हिंदी भाषेमध्ये धनगड असा उच्चारला जातो,त्यामुळे धनगर समाजाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धनगड असणारी जमातच धनगर आहे, या शब्दाची दुरुस्ती करुन धनगर समाजाला एस.टी.आरक्षणाची महराष्ट्र सरकारने तात्काळ आमलंबजावणी करण्याच्या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या वतीने दि २५ सप्टेंबर शुक्रवार रोजी घोषणाबाजी करत ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.


 


     या आंदोलनात धनगर समाजाचे नेते तथा सरपंच ज्ञानेश्वर सरवदे, आशोक डोणे,अविनाश कांडुरे,विलास नेमाणे, संतोष देवकते,रामेश्वर गवळी,सरपंच कल्याण कसपटे, सरपंच किसन वगरे,नारायण भले, तात्या पंचाळ,गजानन देवकते व आंगद मुळे यांचा समावेश होता.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group