नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
मुखेड तालुक्यातील जनसामान्य नागरिकांच्या समस्या व नेहमीच सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे तालुक्यातील सलगरा खुर्द येथील शेख गौसअली अमिनसाब यांची ऑल इंडिया ऊलमा बोर्ड वक्फ विंग मुखेड तालुका आध्यक्ष पदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांची निवड करण्यात आली शोषीत वंचित शेतकरी कष्टकरी कामगार निराधारांच्या न्याय हाक्का साठी लढा देणारे ग्रामीण भागात रक्तदान चळवळ सुरू करणारे रक्त दाते तालुक्यात सर्वांचे मामा म्हणुन परीचीत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शेख गौसआली अमिनसाब सलगरकर मामा यांच्या निवडी बद्दल सर्वत्र आभिनंदन करण्यात येत आहे, शेख गौसआल्ली अमिनसाब सलगरकर यांची नियुक्ती ऑल इंडिया ऊलेमा बोर्ड वक्फ विंग चे महाराष्ट्र प्रदेशाध्याक्ष शेख. फैसल यांनी केली व नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आले या वेळी औरंगाबाद जिल्हाध्यक्ष शेख आसिफ, औरंगाबाद शहर आध्यक्ष नजिब खॉ, महाराष्ट्र मिडीया प्रमुख आनिस रामपुरे, मराठवाडा मिडीया प्रमुख मोईन खॉ, शेख जाकेर, सलगरा खुर्द येथील शेख. हैदर, शेख. आजिज, शेख. फारुख, शेख. दस्तेगीर, शेख. आजमोदिन, यांची ऊपस्थिती होती. शेख गौसअली अमिनसाब यांच्या या निवडीबद्दल डॉ.राहुल कांबळे (पशुधन विमा अधिकारी नांदेड), सामाजिक कार्यकर्ते सुधाकर सोनकांबळे सलगरकर,यशवंत घायाळे,देवबा सोनकांबळे,रामा गोनारे,अंतेश्वर दुधकावडे, पत्रकार भारत सोनकांबळे, शेख फारुख,शेख दस्तगीर, शेषेराव गवळे नंदगावकर,आदींनी गौस अली शेख यांचे पुष्गुच्छ देऊन सत्कार करुन अभिनंदन केले.तसेच शेख गौसअली यांच्या निवडीबद्दल जिल्हाभरातून व तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
COMMENTS