नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
दि.२४ सप्टेंबर रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड व जिल्हा परिषद शिक्षण विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने "बीटस्तरीय शिक्षक संवाद" कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेस डायटचे प्राचार्य मा. डॉ.रवींद्र अंबेकर साहेब यांनी सहभाग नोंदवून उपस्थित मुख्याध्यापक व सहशिक्षक यांना व्हर्च्युअल क्लासरूम,शिक्षक मित्र,पालक मित्र विद्यार्थी मित्र या बाबतची संकल्पना विशद केले.तसेच ऑनलाइन व ऑफलाईन शिक्षणाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
तालुका संपर्क अधिकारी म्हणून डायट चे अधिव्याख्याता श्री चंद्रकांतजी धुमाळे साहेब यांनी या का. शा. उपस्थित राहून शिक्षकाशी ऑनलाइन संवाद साधला .आपल्या मार्गदर्शनात त्यानी दिक्षा अॕप .२५ %कमी केलेला अभ्यासक्रम महा करीयर पोर्टल इ.विषयावर प्रकाशझोत टाकला.
तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मा.श्री संतोषजी शेटकार साहेबांनी गोरगरीब तळागाळातील दिनदुबळ्या वस्त्या वाडी तांड्यातील विद्यार्थ्यांस यशस्वी शिक्षण प्रक्रियेत आणण्याचे आवाहन केले.गावोगावी शिक्षकमित्र तयार करून त्यांच्या फावल्या वेळेत शिक्षण देण्याची योजना राबवू या यासाठी मुखेड तालुक्यातून शिक्षकमित्र तयार करण्याचा संकल्प जाहीर केले.
जाहूर बीटचे बिटचे कार्यतत्पर कार्यकुशल शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री एस.एच.जंपलवाड साहेबांनी* आपल्या बीट मध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
विषय तज्ज्ञ श्री कांबळे सरांनी शै.दिनदर्शिका,दीक्षा ऍप चा वापर व २५ % कमी केलेला अभ्यासक्रम याबद्दल सविस्तर व प्रभावीपणे मार्गदर्शन केले.
विषय तज्ज्ञ जाधव सरांनी अभ्यासमाला व दूरदर्शनवरील टिलिमिली कार्यक्रम याबद्दल सविस्तर माहिती दिली. इयत्ता ९ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी महाकरीयर पोर्टल या विषयावर मोजक्या शब्दामध्ये सविस्तर असे मार्गदर्शन सर्व शिक्षकांना विषयतज्ञ श्री.श्रीकांत थगणारे सर यांनी केले.
ऑनलाइन शिक्षणात शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी कसा तयार करता येईल याबद्दल अभ्यासपूर्ण माहिती
श्री करेवाड सरांनी दिली.
या कार्यशाळेत केंद्रप्रमुख श्री दासरवार सर श्री चंदावाड सर श्री कामन्ना सर यानीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रत्यक्ष उपक्रम राबवून अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.अंबुलगा केंद्रातून श्री सिरंजीपालवार एस.एस. ,श्री जवळदापके पी.बी.राजुरा केंद्रातुन श्रीपुष्पलवार एन.एम.श्री सचिन येशमवार रावणगाव केंद्रातुन श्री मिसाळे एम.डी. श्री सगर डी.एम.यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तांत्रिक सहकार्य श्री शिवाजी कराळे तंत्र स्नेही शिक्षक कें.प्रा.शा.ब्रँच मुखेड व विनोद पाटील वि.तज्ज्ञ यानी केले.
सुत्रसंचलन-कार्यशाळेचे उत्कृष्ट संचलन विषयतज्ज्ञ श्रीकांत थगनारे यानी केले,
शेवटी शिक्षण विस्तार अधिकारी श्री जंपलवाड साहेब यांनी सर्वांचे आभार मानून या बीटस्तरीय शैक्षणिक कार्यशाळेची सांगता केली.
COMMENTS