दहा हजाराची लाच भोवली.
माहूर (प्रतिनिधी ) वाई बाजार ही माहूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत.याच ग्राम पंचायतचा ग्रामविकास अधिकारी राजन्ना गुंडमवार (53 वर्षे ) याने सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या नाहरकत प्रमाण पत्रासाठी दहा हजार रुपयाची लाच मागितली होती.त्यांस आज दि.25 सप्टें. रोजी पांच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने सर्वत्र हडकंप मचला आहे.
वाई बाजार ता. माहूर येथे सार्वजनिक वाचनालय सुरु करण्यासाठी आवश्यक असलेल्या नाहरकत प्रमाण पत्रासाठी गुंडमवार यांनी केलेली दहा हजारांची मागणी मान्य झाली नसल्याने तक्रार कर्त्याने दि. २४ सप्टें. रोजी थेट लाच लुचपत विभागाचे कार्यालय गाठून तिथे रितसर तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आज दि.२५ सप्टें.रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कपिल पूंजाराम शेळके, जगन्नाथ अनंत वाघ, गणेश केजकर, विलास राठोड, नरेंद्र बोडके या टीमने सापळा रचला होता. ठरल्या प्रमाणे पंचासमक्ष पाच हजार रुपयाच्या लाचेची रक्कम स्विकारतांना ग्राम विकास अधिकारी राजन्ना गूंडमवार हा अलगत जाळ्यात अडकला.
COMMENTS