नायगांव /प्रतिनिधी
नायगांव तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे सावरखेड येथील रहिवासी हा गेल्या तीन दिवसा पासून बेपत्ता असलेल्या निळकंठ करमाळेचा मृतदेह त्यांच्या स्वताच्या एका मुलानीच पडक्या विहिरीत तरंगताना पाहिला आणि मयताच्या चारही मुलाना चांगला धक्का बसला असल्याचे दिसुन आले आहे
तालुक्यातील सावरखेड येथील स्वताच्या विहिरीत आत्महत्या केलेल्या निळकंठ तुकाराम करमाळे वय ५० वर्ष यांनी घुंगराळा येथे वेल्डिंगचे दुकान टाकून आपला संसार चालवित होता परंतु दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी संध्याकाळी ठिक सहा ते सात
वाजण्याच्या दरम्यान घरातून निघून जावून बेपत्ता झाले होते त्यांचा मुलगा सुरेश निळकंठ करमाळे यांनी त्यांच्या नातेवाईकाकडे वडिलाचा शोध घेतला परंतु कुठेच मिळून आले नसल्यामुळे अखेर पर्याय म्हणून रुई बु येथे आले तसेच मधला मार्ग सावरखेड येथे असलेल्या स्वताच्या विहिरीत पाहिले असता वडिलाचा मृतदेह तरंगताना दिसला आहे
सदर घटना दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली असल्यामुळे कुंटूर पोलिस ठाण्याचे स पो नि के एस पठाण यांच्या सह फौजदार येवले , बीट जेमादार कुमरे , पो का घूमे
यांनी घटनास्थळी रवाना होऊन घटनेचा पंचनामा केला सदरचे प्रेत ताब्यात घेवून नायगांवच्या ग्रामीण रुग्णालयात शेवविच्छेदनासाठी घेवून गेले मयताच्या अंगात काळसर रंगाचा पँट , अंगात बन्यान, व विहिरीत तरंगताना उबड्या अवस्थेत आढळून आले त्यांना चार मुल , पत्नी , भाऊ असले तरी कुटुंब प्रमुखाला आत्महत्या करण्याची वेळ का ? आली व त्यांच्या मृत्यूचे कारण अध्याप समजले नसल्याचे पोलीसांनी सांगितले आहे .
COMMENTS