नायगांव प्रतिनिधी
मांजरम गावात व परिसरातील शुक्रवारी दि.25 सप्टेंबर 2020 मुसळधार 110 मिली पाऊस झाला आहे, हा पाऊस ढग फुटी झाली म्हणावा लागेल कारण चार तासच ही पाऊसाची नोंद झाली आहे.
सोयाबीन, कापूस,ज्वारी ,मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे ,ही सर्व पिके रानात आडवे पडले आहेत, रानात पाणीच पाणी साचले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी शेतीत जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
यावेळी पांडुरंग शिंदे म्हणाले, नुकसान झालेल्या पिकाचे सरकारने पंचनामे करण्यात वेळ घालू नये , सॅटेलाइटचा उपयोग करून पाहणी करावी व मदत जाहीर करावी.कारण बोगस सोयाबीनच्या बियाणेमुळे शेतकरी मेटाकुटीला गेला आहे, दुबार- तिबार पेरणी मुळे पिकांचे उत्पादन कमी होणार आहे,ज्याचे हातात आलेले पीक या पाऊसामुळे वाया जाणार आहे.
एकीकडे मूग- उडीत पिकांचे नुकसान झाले होते त्याचे पंचनामे झाले नाहीत किंवा मदत जाहीर झाली नाही दुसरीकडे बोगस बियाणेमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक दमडी मिळाली नाही. शासनाने या सर्व परिस्थिती कडे डोळस नजरेने पाहून तात्काळ मदत जाहीर करावी व पीक विमा लागू करावा अन्यथा शेतकऱ्याचे तरणीबांड पोर कायदा सुव्यवस्था हातात घेऊन आंदोलन करतील लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांना फिरू देणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी असा इशारा पांडुरंग शिंदे यांनी दिला आहे.
यावेळी वामनराव शिंदे, शिवाजी गायकवाड, विश्वनाथ शिंदे, व्यंकट शिंदे,हणमंत शिंदे, शिवराज गोलेवार अनेक शेतकरी उपस्थित होते.
COMMENTS