केज तालुक्यातील बेलगाव येथील बेलगाव ते माळेवाडी या रस्त्यावर आता पर्यंत अनेक विभागा मार्फत रस्त्यावर रस्ता तयार करण्यासाठी निधी टाकण्यात आला होता परंतु त्या विभागाच्या दुर्लक्षित पणा मुळे गुत्तेदाराने हा रस्ता अंदाज पत्रका प्रमाणे न बनवता निकृष्ट दर्जाचे काम करून रस्त्याचे काम अपुर्ण सोडले आहे.या मुळे पावसाळ्यात नागरिकांना या रस्त्याने ये जा करणे कठीण झाले आहे.
बेलगाव ते माळेवाडी या रस्त्यावर केलेल्या कामाची चौकशी करावी,कोणत्या विभागाने हा रस्ता केला आहे किती रुपये या रस्त्यासाठी खर्च करण्यात आले आहेत,हा रस्ता किती किलो मीटर तयार करणे होता,रस्त्याच्या बाजूने झाडे कोणत्या योजनेतून लावली होती,रस्त्यावर पुल न बांधता फक्त सिमेंट चे पाईप नाली मध्ये टाकले आहेत या सर्व कामांची चौकशी करावी व गुत्तेदाराने अर्धवट व निकृष्ट केलेले काम पूर्ण करण्याच्या सूचना काम करणाऱ्या विभागाला देण्यात याव्यात अन्यथा पुढील पंधरा दिवसात मनसे बेलगाव गावच्या नागरिकांना घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा ईशारा मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस,मनसे चे केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार,मनसे चे शहर अध्यक्ष संतोष अस्वले,केळगाव ग्रामपंचायत सदस्या राधा घुले,बेलगाव ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर दातार,विक्रम भांगे,रामेश्वर चौरे,वचीष्ठ दातार,मधुकर घुले,अजित दातार,ऋषिकेश दातार यांनी निवेदना द्वारे केज तहसीलदार यांना दिला आहे.
COMMENTS