महेंद्र पुरी, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी
हिंगोलीचे जिल्हा पोलिस अधिक्षक आयपीएस योगेश कुमार यांची बदली झाल्यानंतर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला तर नुतन पोलिस अधिक्षक आयपिएस राकेश कलासागर यांनी शनिवारी पदभार स्विकारला
योगेश कुमार यांनी आपल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात अवैध धंदेचालकांना चांगलाच घाम फोडला होता तर अधिकारी कर्मचारी यांना ही चांगलाच वचक निर्माण झाला होता.
तर काहि अवैध धंदेचालक व कर्मचारी यांनी योगेश कुमार यांच्या बदलीने सुटकेचा निश्वास टाकल्याचे दिसुन आले..मागील दोन महिन्यांपासुन आएपिएस अधिकारी यांच्या बदलीची चर्चा जोरात होती पण बदलीला मुहूर्त लागत नव्हता अखेर राज्यशासनाने बदलींचे आदेश काढले योगेश कुमार यांच्या बदलीची उत्सुकता पोलिस दलातील अनेक अधिकारी कर्मचारी यांना लागली होती. योगेश कुमार यांची बदली झाली असली तरी मात्र नांदेड परिक्षेत्रात एक कर्तव्यदक्ष डिआयजी निसार तांबोळी दाखल झाल्याने व त्यांना हिंगोली जिल्हायाचा मोठा अनुभव असल्याने उत्साहात विरजण हि पडले आहे. निसार तांबोळी यांनी गुरूवारी आपल्या पहिल्याच हिंगोली दौर्यात ठाणेदाराच्या बैठकीत अनलिगल अँक्टिवीटी खपुन घेणार नसल्याचे सांगितले. नुतन पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी अकोला येथे असतांना उत्कृष्ट कर्तव्य बजावल्याचे समजते त्यांनी अकोला येथे सोशल पोलिसींग बरोबरच अवैध धंदेचालकांना सळो की पळो करून सोडल्याचे समजते हिंगोली जिल्ह्यात ही नुतन एसपि यांना अवैध धंदेचालकांचे मोठे आवाहन असणार आहे.
तर डिआयजी तांबोली यांच्या परिक्षेत्रातील एन्ट्री ने अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले आहेत..
COMMENTS