धर्माबाद-(अहमद लड्डा)
भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आमदार राजेश पवार यांच्या मार्गदर्शनात ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश अण्णा गौड यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रम धर्माबाद शहरात संपन्न झाले.
यावेळी नगर पालिकेचे माजी सभापती गंगाधर गौड,रामेश्वर गंदलवार,सतिष मोटकूल, सज्जन गडोड,चेतन घाटे,अमित मुंदडा, गिरीधर बुंदेले,नानकसिंग ढिल्लो, शंकर तुनकेवार,तुकाराम पाटील महागवळी,रवी रेंनलोड,राजू वाघाळे,दता उगेवाड, दतु धडेकर येताळा, चंद्रकांत पाटील पांगरीकर,आकाश मंथोड आणि विक्की आदीजण उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून भाजपाने सर्वांसाठी विविध योजनेच्या माध्यमातून विकासाचा मार्ग खुला केला असून सबका साथ सबका विकास यानुसार भाजपचे काम चालू आहे. सर्वसामान्य जनतेच्या आडी-अडचणी सोडवण्यासाठी भाजपाचे परिवारीक सद्स्य म्हणून सदैव जागृत राहू व नागरिकांना मदत करीत पक्षवाढ करू असा निर्धार यावेळी भाजपचे युवा नेतृत्व सतिश मोटकूल यांनी व्यक्त केला.
COMMENTS