_______________________
केज तालुक्यातील असलेलं मांजरा धरणाचे मुख्य कार्यालय लातूर येथे असून ते कार्यालय धरणावर किंवा धरणक्षेत्रात करण्यात यावे यासाठी संभाजी ब्रिगेड केज च्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
मांजरा धरण हे प्रामुख्याने लातूर अंबाजोगाई केज धारूर सह मोठ मोठया शहरांना तसेच 50 ते 60 ग्रामपंचायत ला पिण्यासाठी पाणी पुरवठा करणारे एकमेव धरण असून या धरणावर शेतकरी मोठया प्रमाणात अवलंबून आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्यात गेल्या असे शेतकरी उपाशी आणि ज्यांचं काहीही नुकसान झालेलं नाही किंवा जमिनी गेलेल्या नाहीत असे तुपाशी धरणावर शेतकऱ्याच्या काही अडी अडचणी असतील तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की कोणाशी संपर्क करावा याचे कार्यालय तर लातूर येथे आहे धरणावर कोणी अधिकारी सापडत नाही काही काम असतील तर या लातूर ला धरण केज तालुक्यात आणि पाणी वाटप समितीचे अध्यक्ष लातूरचे पालकमंत्री हा अन्याय येथिल धरणग्रस्त शेतकरी वर्गावर का म्हणून प्रशासनाने येथील सर्वसामान्य जनतेचा विचार करून धरणाचे मुख्य कार्यालय हे धरणावर करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे केज तालुका अध्यक्ष राहुल खोडसे यांनी निवेदनात म्हटले आहे यावेळी निवेदनावर संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष राहुल खोडसे, शशिकांत इंगळे,संदीप शितोळे,विष्णू थोरात,हर्षवर्धन खोडसे आदींच्या स्वाक्षरी आहेत
COMMENTS