धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंडित दिनयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी व पत्रकारांचा गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि पत्रकारांना दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता आणि पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करून झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे होते. व्यासपीठावर धर्माबाद भाजपा तालुका अध्यक्ष रामचंद्र पाटील बन्नालीकर, जिल्हा उपाध्यक्ष रवी अण्णा पोटगंटीवार, जिल्हा सरचिटणीस भास्कर भिलवंडे, जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटालकर, धर्माबाद स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी प्रशांत असुरे, माजी उप-नगराध्यक्ष व भारत सरकारच्या बीएसएनएल सल्लागर समितीचे सदस्य मुगला गौड, पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती जिल्हा संयोजक डॉ.माधवराव उचेकर, नगरसेवक संजय पवार उपस्थित होते. कार्यक्रमास संचालक दत्ताहरी पाटील आवरे, श्यामसेठ झंवर, सोशल मीडिया प्रमुख साईनाथ शिरपुरे, पिराजी पाटील चव्हाण, तुकाराम पाटील महागवली, व्यापारी अंकित गोधा, अमित मुंदडा, गिरीधर बुंदेले, नानकसिंग ढिल्लो, नरसिंग पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार जी.पी. मिसाळे सर, संजय कदम, कृष्णा तिम्मापुरे, बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव हणमंते, गंगाधर धडेकर, सतिश शिंदे, अहमद लड्डा,अशोक पडोळे आणि मदनपाल बनसोडे यांना पुष्पगुच्छ व दोन लाखांचा संरक्षण विमा देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष रामचंद्र पाटील बन्नाळीकर यांनी केले व पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि भारतीय जनता पक्षाने केलेल्या कार्याची माहिती दिली. भाजपाचे सरचिटणीस शिवराज पाटील होटालकर, डॉ.उचेकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी मार्गदर्शन केले. बाजार समितीचे संचालक संजय पाटील शेळगावकर यांनी संचालन केले तर दत्ताहरी पाटील आवरे यांनी आभार मानले.सर्व पाहुन्याच्यां हस्ते पत्रकार व गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविन्यात आले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
COMMENTS