- पोलिस पेट्रोल पंपाचे आयजी तांबोळी यांच्या हस्ते आज उद्घाटन
- महेंद्र पुरी, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी
हिंगोली शहरातील ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या शेजारी आज दुपारी चार वाजता पोलीस पेट्रोल पंपाचे उद्घाटन संपन्न होणार आहे.
उद्घाटन प्रसंगी निसार तांबोळी पोलीस उप महानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड यांची उपस्थिती राहणार असल्याने व नुतन आयजी तांबोळी पहिल्यांदाच हिंगोली दौऱ्यावर येत असल्याने पोलिस यंत्रणा अक्शन मोडवर असल्याचे दिसुन येत आहे..
पोलिस अधिक्षक योगेश कुमार हे हिंगोलीत रूजु झाल्या पासूनच अवैध धंदेचालकांचे कर्दनकाळ ठरले आहेत तरीही साहेबांच्या चोरी छुपे पोलिस दलातील काही ठाणेदार व जमादार यांच्या सायलेंट मोडच्या सहकार्याने अवैध धंदै ज्यामधे गुटखा, मटका, दारू विक्री सुरूच आहे असे ठाणेदार व जमादार आयजी निसार तांबोळी यांच्या दौर्यामुळे अचानक अँक्शन मोड वर आले असुन चोरीछुपे सुरु असलेल्या अवैधदंधे चालकांना धंदे बंद ठेवण्याच्या कडक सुचना दिल्याची माहिती खास सुत्रांकडुन मिळाली आहे..
तर नुतन आयजी निसार तांबोळी यांनी या अधी हिंगोलीत उपाधिक्षक पदावर काम केले असुन त्यांना जिल्हाचा चांगलाच अनुभव आहे..त्यांच्या कर्तबगार कामगिरीमुळे त्यांचे नाव आजही जिल्हात चर्चीले जाते..त्यांच्या मागील कामगिरी मुळे जिल्ह्यातील अवैध धंदेचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत..तर सायलेंट मोडवरील ठाणेदार अचानक अँक्शन मोडवर आल्याचे सुत्रांकडुन समजले आहे...
यावेळी नुतन आयजी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत
पेट्रोल पंपाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांनी केले आहे..
COMMENTS