---------------------------------- केज/बातमी:- विभागीय उपायुक्त शिवानंद टांकसाळे यांना आय.ए.एस. बहाल झाल्या बद्दल त्यांचा आदिवासी पारधी सम...
----------------------------------
केज/बातमी:- विभागीय उपायुक्त शिवानंद टांकसाळे यांना आय.ए.एस. बहाल झाल्या बद्दल त्यांचा आदिवासी पारधी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बीड येथे जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक तथा अप्पर जिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावले आणि सध्या विभागीय उपाययुक्त, औरंगाबाद या पदावर कार्यरत असलेले शिवानंद टांकसाळे यांना नुकताच भारत सरकारने आय.ए.एस. बहाल केले आहे. त्या निमित्त आदीवासी पारधी समाजाचे भागवत पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विभागीय उपायुक्त टांकसाळे यांची औरंगाबाद येथे भेट घेऊन त्यांचा पुष्गुच्छ, शाल व एक रोपटे देऊन सत्कार केला. या वेळी भागवत पवार यांच्या सोबत शंकर काळे, आशा काळे, प्रसाद पवार, माने मॅडम आणि पत्रकार विजय बहादूरे यांच्यासह पारधी समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------
COMMENTS