*केज प्रतिनिधी*
*केज:*- सध्या अंबेजोगाई येथील शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. या रक्तपेढीस रक्तपुरवठा होणे गरजेचे आहे. यासाठी येत्या मंगळवार दि 29 रोजी रोटरी क्लब ऑफ केज ने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात केजवासीयांनी स्वयंमस्फुर्तपणे रक्तदान करावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ केज च्या वतीने करण्यात आले आहे. हे शिबिर केज रोटरीचे दिवंगत अध्यक्ष प्राचार्य लक्ष्मणराव डोईफोडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या वर्षीच्या पहिला सामाजिक उपक्रम म्हणून केज रोटरी रक्तदान शिबिर घेत आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आयुष्यात या दानाची बरोबरी कशातही नाही. असंख्य रक्तदाते रक्तदान करून मोठी सामाजिक बांधिलकी जोपासतात. केज शहरातही शेकडो युवक व नागरिक दरवर्षी स्वेच्छेने रक्तदान करतात.
बीड जिल्ह्यात आंबेजोगाई येथील शासकीत रक्तपेढी अंबेजोगाई, केज, धारुर, माजलगाव व परळी तालुके व परिसरातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भागवते. या रक्तपेढीस सध्या रक्ताची कमतरता भासत असल्याने केज शहरात येत्या मंगळवार दि 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले . हे शिबिर केज रोटरीचे दिवंगत अध्यक्ष प्राचार्य लक्ष्मणराव डोईफोडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या वर्षीच्या पहिला अत्यावश्यक सामाजिक उपक्रम म्हणून आयोजित केले आहे.
तरी या शिबिरात केज शहर व परिसरातील युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रोटरी क्लब च्या वतीने अध्यक्ष हनुमंत भोसले, सचिव धनराज पुरी व सदस्यांनी केले आहे.
COMMENTS