माजलगाव प्रतिनिधी
तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे शिवाय गोदावरी नदीला आलेल्या पुराने गोदाकाठची पूर्ण पिके वाहून गेली असून शेतकऱ्याची पिके नेस्तनाबूत झाले आहेत याबाबत पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही, शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मागणी करूनही तहसील प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अद्याप पंचनामे सुरू केले नाहीत त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ऍड नारायण गोलेपाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी नुकसानग्रस्त शेतीतले तुरीची झाडे व निवेदन तहसिलदारांना देऊन तात्काळ पंचनाम्याचे साकडे घातले,
गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यात अतिवृष्टी प्रचंड प्रमाणात झालेली असल्याने शेतकऱ्यांचे उसाचे पूर्ण पिके जमिनीवर पडलेली आहेत, तर सोयाबीन कापूस बाजरी झाडावरच उगवत असून तुरीचे पिक जास्तीच्या पावसामुळे पाणी लागून जळून जाऊ लागली आहेत परंतु अद्याप प्रशासन सुस्त असून शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करायला तलाठी व मंडळ अधिकारी यांनी सुरुवात देखील केलेली नाही म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी शेतात पाणी लागून वाळलेल्या तुरीची झाडे भेट देऊन व तात्काळ पंचनामे करण्याबाबत निवेदन दिले व तात्काळ पंचनामे न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात केलेला आहे या निवेदनावर भाई ऍड नारायण गोले पाटील, सिद्धेश्वर गायकवाड, राजेश डाके, वसंत परसे, राहुल सोळंके, गणेश गायकवाड, महादेव गायकवाड, जी.एम. गजमल, क्षितीज आढाव, पोटभरे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
COMMENTS