- - मराठा आरक्षण संदर्भात ओबीसी चा विरोध नाही
- - मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ओबीसी महासंघाची भूमिका
माजलगाव/प्रतिनिधी
ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना आजपर्यंत केलेली नाही ओबीसी ची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी यात मराठा समाजाच्या आरक्षणास ओबीसी चा विरोध नसुन ओबीसीमध्ये न देता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे या मागणी साठी ओबीसी महासंघाचे तहसिलदार याना निवेदन देण्यात आले आहे यावेळी माजी नगर अध्यक्ष अशोक तीडके, जि प स शरद चव्हाण , जि.प.सदस्य प्रकाश गवते, माजी जि प स शिवप्रसाद खेञी, ईश्वर खुरपे , मल्हार सेनेचे आशोकराव डोणे, महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विलास नेमाणे, तालुका अध्यक्ष शामसुंदर पांचाळ, पंडीत मेंडके, राम गायकवाड ,रुकमानंद खेञी सुर्येकांत दराडे, शुशांतराव जाधवर आशोकराव धारक,धोबी समाजाचे युवक ता.अध्यक्ष जगन्नाथ शिंदे ,युवराज राठोड कृष्णा ठोंबरे, भागवत गोरे, सुतार समाजाचे शुभाष नन्नवरे, मोहनराव डुकरे, लोहार समाज जिल्हा संघटक चंद्रकांत पोपळे,शाम घेणे, गजानन खामकर आदी सह ओबीसी महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
COMMENTS