नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
मुखेड तालुक्यात माघील २० दिवसापासुन होत असलेला सतत मुसळधार पाऊस व होत असलेल्या अतिवृष्टी मुळे आंबुलगा (बु) येथिल पाझर तलाव तुडूंब भरला आहे. आंबुलगा येथिल पाझर तलावाची भिंत व सांडव्याची पडझड झाल्यामुळे आणी सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पाण्याची आवक पाहता आंबुलगा येथिल तलाव फुटण्याची दाट शक्यता आहे.
लोकांना काम देण्याबरोबरच भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्याच्या उद्देशाने मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथे २९ वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या पाझर तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे डोळेझाक होत असल्याने ,मुखेड तालुक्यात झालेली अतिवृष्टी पाहता, आंबुलगा (बु) येथिल पाझर तलाव धोकादायक झाल्याचे आजचे चित्र आहे.
आंबुलगा (बु) येथे २९ वर्षापूर्वी पाझर तलावांची निर्मिती करण्यात आली. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून टंचाईच्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला. या तलावांच्या निर्मितीमुळे चांगला पाणीसाठा होऊन आंबुलगा (बु) परिसरातील पाणी पातळीत वाढ होण्यास मदत झाली. परिसरातील विहिरी जिवंत झाल्याने शेतीलाही हे तलाव चांगले लाभदायक ठरले. मात्र सद्य परिस्थितीत मुखेड तालुक्यात होत असलेली अतिवृष्टी पाहता मुखेड तालुक्यातील अनेक पाझर तलाव फुटत आहेत , तसेच त्यांच्यात गाळदेखील साचल्यामुळे अपेक्षित पाणीसाठा होत नसल्याने त्यांचा हेतू विफल होत आहे. त्यामुळे आंबुलगा (बु) येथिल तलाव फुटण्याचाही धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पाझर तलावांच्या निर्मितीनंतर २९ वर्षात त्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी देण्यात आलेला नसल्याची तक्रार होत आहे. . तसेच जलयुक्त शिवार योजनेत निवड झालेल्या काही गावांमध्येही दुरुस्तीची कामे झाली. परंतु, आंबुलगा येथिल पाझर तलावांच्या दुरुस्तीकडे कोणाचेच विशेष निधी देण्याचे , लक्ष नसल्याची दिसुन येत आहे. त्यामुळे आंबुलगा येथिल पाझर तलावाची झालेली पडझड पाहता , मुखेड तालुक्यातील बेन्नाळ व गोजेगाव येथिल नुकत्याच फुटलेल्या पाझर तलावासारखे आंबुलगा येथिल पाझर तलावाची गत होईल कि काय ? अशी भिती आंबुलगा येथिल नागरिकात निर्माण झाली आहे..
COMMENTS