केज (प्रतिनिधी) : केज तालुक्यातील नांदुरघाट या जि.प. गटामध्ये दि.६ अॉगस्ट पासुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष सुमंत धस तसेच केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार यांच्यामार्फत आर्सेनिक आल्बम -३० या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्या गोळ्याचे मोफत वाटप करण्यास सुरुवात केली आहे.
सद्या कोरोना या संसर्गजन्य रोगाने भारतातच नव्हे संपुर्ण जगामध्ये हाहाकार माजवला आहे. त्यामुळे संपुर्ण मानवजातीमध्ये भितीचे वातावरणा तयार झाले आहे. त्यामुळे यावर कायमस्वरुपी विलाज करण्यासाठी लस शोधण्यास तज्ञ सरसावले आहेत. तत्वतः ज्या मानवाच्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा मानुष्याला हा आजार पिडित व्यक्तिपासुन लवकर होत असल्याचा धोका जास्त आहे असे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मनुष्याच्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व कोरोना विषाणुशी लढण्यासाठी आयुष मंत्रालयाने जाहिर केलेल्या आर्सेनिक अल्बम-३० या होमिओपॕथिक गोळ्याचे मोफत वाटप केज तालुक्यातील नांदुरघाट जि.प. गटातील दहा हजार कुटूंबांना महाराष्ट्र नवानिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष सुमंत धस तसेच केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार यांच्या तर्फे करण्यास सारणी (सां) येथुन सुरुवात केली असुन सारणी व सांगवी गावातील तीनशे कुटूंबांना वाटप केली आहे. त्यामुळे या गोळ्या सांगितल्याप्रमाणे नियमित सेवन केल्यास याचा फायदा निश्चित होणार असल्याचे सुमंत धस यांनी सांगितले आहे.
या उपक्रमात मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस, मनसेचे केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार यांच्यासह सूर्यकांत देशमुख, प्रल्हाद ठोंबरे, अभिमान घोळवे, सांगवी ग्रा.पं.सदस्य शरद केदार, हानुमंत केदार, कृष्णा धस, महेश धस, दत्ता घोळवे, राहुल घोळवे, काका भांगे, गणेश गिरी, गोकुळ देशमुख, बाळासाहेब जाधव, दिनकर जाधव, शंकर जाधव, गोविंद भांगे, नारायण केदार आदींसह दोन्ही गावातील तरुण सहभागी होते.
COMMENTS