काल जिल्ह्यात १६८ बाधितांची भर ; ८३ व्यक्ती बरे तर सहा जणांचा मृत्यू

  नांदेड :- जिल्ह्यात काल ६ ऑगस्ट रोजीच्या अहवालानुसार ८३ व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचब...


 


नांदेड :- जिल्ह्यात काल ६ ऑगस्ट रोजीच्या अहवालानुसार ८३ व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर १६८ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. कालच्या एकूण ५२१ अहवालापैकी ३१६ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २ हजार ८६० एवढी झाली असून यातील १ हजार २१५ एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण १ हजार ५२३ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील ६५ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.


 


बुधवार ५ ऑगस्ट रोजी गोकूळ नगर नांदेड येथील ६४ वर्षाची एक पुरुष, देगलूर येथील ७० वर्षाचा एक पुरुष, चिखलवाडी नांदेड येथील ७४ वर्षाचा एक पुरुष, दापका राजा मुखेड येथील ८० वर्षाची एक महिला, मुखेड येथील ७४ वर्षाचा एक पुरुष यांचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नांदेड येथे तर मकबुल नगर नांदेड येथील ६५ वर्षाची एक महिला जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या १०९ एवढी झाली आहे.


 


आज बरे झालेल्या ८३ कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील १, कंधार कोविड केअर सेंटर येथील ७, देगलूर कोविड केअर सेंटर येथील १५, भोकर कोविड सेंटर येथील १, खाजगी रुग्णालय २९, मुखेड कोविड केअर सेंटर येथील १०, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथील ३, नांदेड पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील १४, बिलोली कोविड सेंटर येथील २, औरंगाबाद येथील संदर्भित १ असे एकूण ८३ कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.


 


आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये नांदेड मनपाक्षेत्र ४३, अर्धापूर तालुक्यात ४, देगलूर तालुक्यात ३, हदगाव तालुक्यात १, मुखेड तालुक्यात २१, परभणी जिल्हा २, नांदेड ग्रामीण ४, भोकर तालुक्यात ५, धर्माबाद तालुक्यात ३, लोहा तालुक्यात ४, उदगीर १, यवतमाळ जिल्हा २ असे एकूण ९३ बाधित आढळले.


 


अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ५५, बिलोली तालुक्यात १, हदगाव तालुक्यात १, किनवट तालुक्यात १, नायगाव तालुक्यात १, अर्धापूर तालुक्यात ६, देगलूर तालुक्यात ८, कंधार तालुक्यात १, माहूर तालुक्यात १ असे ७५ बाधित आढळले.


 


जिल्ह्यात १ हजार ५२३ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १५२, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ५२९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ४४, नायगाव कोविड केअर सेंटर येथे ८१, बिलोली कोविड केअर सेंटर येथे ३५, मुखेड कोविड केअर सेंटर येथे १२३, देगलूर कोविड केअर सेंटर येथे १०१, लोहा कोविड केअर सेंटर येथे ७, हदगाव कोविड केअर सेंटर ६७, भोकर कोविड केअर सेंटर ३, उमरी कोविड केअर सेंटर १४, कंधार कोविड केअर सेंटर येथे १२, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे २९, किनवट कोविड केअर सेंटर येथे २९, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे १८, मुदखेड कोविड केअर सेटर १५, हिमायतनगर कोविड केअर सेंटर २०, माहूर कोविड केअर सेंटर येथे १०, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे १९, बारड कोविड केअर सेंटर ३, महसूल भवन कोविड केअर सेंटर ४९, खाजगी रुग्णालयात १५२, औरंगाबाद येथे संदर्भित ५, निजामाबाद येथे २ बाधित, हैदराबाद येथे १ तर मुंबई येथे १ बाधित संदर्भित झाले आहेत.



  •  

  • जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

  •  

  • सर्वेक्षण – १ लाख ४९ हजार ६८९,

  • घेतलेले स्वॅब – १९ हजार ४५९,

  • निगेटिव्ह स्वॅब – १४ हजार ७८०,

  • आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 168,

  • एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती – २ हजार ८६०,

  • आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या – निरंक,

  • आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या – १०,

  • मृत्यू संख्या – १०९,

  • रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या – १ हजार २१५,

  • रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती – १ हजार ५२३,

  • आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या – ६३५.

  •  


प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.


COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel