*श्री.संस्कार कॉम्प्युटर सेंटर चिंचोली माळी च्या वतीने गुणवंतांचा सत्कार* 

*श्री.संस्कार कॉम्प्युटर सेंटर चिंचोली माळी च्या वतीने गुणवंतांचा सत्कार* 


======================


केज :प



केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री.संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर च्या वतीने परिसरातील एस.एस.सी परीक्षेतील 


 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्री. संस्कार कॉम्प्युटर सेंटर चे संचालक अनिल गलांडे यांच्याकडून करण्यात आला.


  यावेळी येथील कर्मवीर विद्यालयात अनुक्रमे प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थिनी कु.सृष्टी हरिश्चंद्र मुळीक 94.80% व कु.तेजल महारुद्र लिगाडे 91.80 तर चिंचोली माळी येथील नातू व सध्या वाशी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचा विद्यार्थी चि.प्रतीक प्रताप चव्हाण 96.80% गुण तसेच येथील रहिवासी परंतु सरस्वती विद्यालय लातुर येथे शिक्षण घेतलेले चि. आदित्य अनिल गलांडे 92.80% व चि.विशाल विकास जाधव 90% यांनी गावाची व शाळेची मान उंचविल्यामुळे व पुढील शैक्षणिक जीवनात अशीच जींकण्याची उमेद कायम रहावी म्हणून सेंटरच्या वतीने या सर्वांचा सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यातआल्या.


 


 यावेळी बोलताना गौतम बापू गलांडे यांनी जिद्द, चिकाटी व सातत्याच्या जीवावर आपण जीवनात उत्तुंग यशाची शिखरे सर करू शकतो असा मोलाचा सल्ला दिला.यावेळी सरपंच सुनील बापू देशमुख, गौतम बापू गलांडे, ग्रामपंचायत सदस्य कुमार गायकवाड,अंकुश नाना निंगुळे, 


 महादेव गलांडे, मनोज गलांडे, कैलास घुंबरे, महारुद्र लिगाडे, जालिंदर गलांडे इत्यादी सोशल डिस्टंन्स पाळून उपस्थित होते.


 


   (फोटो)


टिप्पण्या