-----------------------
(नांदेड - विठ्ठल कल्याणपाड )
मुखेड तालुक्यातील शांती निकेतन आंबुलगा (बु) विद्यालयाची विद्यार्थिनी कु .प्रतिक्षा देविदास झाडे रा .आंबुलगा (बु) ता .मुखेड ही ग्रामीण भागातील मुलगी प्रतिकूल परिस्थिती वर मात करून इयत्ता दहावी बोर्ड च्या परीक्षेत ८३.२० टक्के गुण घेऊन विशेष प्राविण्यासह उतीर्ण झाली आहे. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे .कु प्रतिक्षा ही मोठ्या जिद्दीने अभ्यास करून दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश मिळवली तिच्या या यशाबद्द्ल आंबुलगा (बु) ग्रा.प.सरपंच सौ.सुशिलाताई संजयराव आकुलवाड ,शांती निकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकरराव मामीलवाड , प्रतिष्ठित व्यापारी बाबुसावकार उलिगडे , पोलीस पाटिल विठ्ठलराव कौरवाड ,युवा पत्रकार विठ्ठल कल्याणपाड ,आदीसह सर्व शिक्षकवृंद परिसरातील नागरिक यांच्या कडून कु.प्रतिक्षा हिचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
COMMENTS