जलसंपदा विभागाचे श्रीहरी मस्के सेवानिवृत्त 

 


 


माजलगाव/भास्कर गिरी 


केसापुरी कँँम्प येथील जलसंपदा विभागाचे कर्मचारी श्रीहरी कोंडीबा मस्के दि.31 जुलै रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांनी जलसंपदा विभागात 42 वर्षे कर्तव्य बजावले असून त्यांना सेवानिवृत्त झाल्याबद्दल जलसंपदा विभाग कडा भवन औरंगाबादचे मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक दिलीपराव तवार साहेब यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 


     तसेच पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून निष्काम सेवा हे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या गृृहरक्षक दल (होमगार्ड) माजलगावच्या तुकडीचे पलटन नायक म्हणून 2006 पर्यंत 23 वर्षे सेवा केली त्यात 13 वी अखिल भारतीय क्रीडा स्पर्धा जम्मू & कश्मीर येथील श्रीनगर येथे 23 सप्टेंबर 1989 ला क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.त्या स्पर्धेत गृृहरक्षक दल (होमगार्ड) महाराष्ट्र राज्याच्या वतीने सहभाग नोंदवून नेतृत्व केलं होत.त्यांच्या या सेवानिवृत्ती निमित्ताने बापूराव मस्के,बि.वाय.उघडे 


सौ.वृृंंदावणी श्रीहरी मस्के,डॉ.सविता सिद्धार्थ मस्के, सुनील मस्के,चि.सुजातदादा मस्के,श्रीकांत मस्के, अनिल मस्के,प्रा.प्रसेंजित मस्के,अॅड.विजय मस्के ,सौ.क्रांती सिद्धार्थ सोनूले,सौ.वर्षा भुषण कांबळे ,रावण सिरसट,आर.ए.चव्हाण,अॅड.अमोल डोंगरे, पत्रकार उमेश जेथलिया, सुदर्शन स्वामी,भास्कर गिरी, रविकांत उघडे,सचिन उजगरे,पत्रकार सुमेध उघडे ,प्रा.शिवदास घाडगे,केतन मस्के यांच्यासह आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.


टिप्पण्या