Yजागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवर येथे मोरया प्रतिष्ठान, सेलूच्या सहकार्याने सहस्त्र घन वन प्रकल्प विकसित

त !!*


सेलू ( ) सोशल मीडियावर मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन मोहिमेअंतर्गत पर्यावरणाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून वृक्षारोपणासोबतच कमी जागेत जास्त झाडांचे संवर्धन करता यावे म्हणून उपजिल्हा रुग्णालय येथे एका वर्षात यशस्वी झालेल्या सहस्त्र घन वन प्रकल्पाच्या उपक्रमाची माहिती प्रसारित करण्यात येते हि माहिती जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या विदर्भातील लोणार सरोवर नगर परिषदेचे मुख्याधिकारी *विठ्ठल केदारे साहेब* यांच्या दृष्टीस पडल्यावर त्यांनी मोरया प्रतिष्ठान प्रतिनिधींना संपर्क करत लोणार शहरात घन वन प्रकल्प विकसित करण्याचा मानस व्यक्त करत लोणार नगर परिषदेचे शिक्षक,कर्मचारी,अधिकारी सेलू शहरात एक वर्षात विकसित केलेल्या घन वन प्रकल्पाची माहिती व छायाचित्रे दाखवत आपल्याकडे सुद्धा हा प्रकल्प केला तर आपल्या जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या शहराच्या वैभवात भर पडेल असे सांगितले असता सर्वांनी होकार दर्शवत सेलू सारखाच घन वन प्रकल्प आपल्या लोणार शहरात स्व खर्च व परिश्रमाने विकसित करण्याचे ठरवले.


शहरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत जिथे उकिरडा झालेला होता त्याठिकाणी घन वन प्रकल्प विकसित करण्याचे ध्येय मुख्याधिकारी यांच्या सह कर्मचाऱ्यांनी ठेवले.


सेलू येथील मोरया प्रतिष्ठान परिवाराच्या प्रतिनिधींशी संपर्क करत घन वन प्रकल्पाची पूर्व तयारी समजून घेत उकिरडा असलेल्या जागेचे मोजमाप करत संरक्षण जाळी लावण्याचे काम सुरू केले.राज्यात सर्वत्र लॉक डाऊन असल्यामुळे फोन द्वारे दरदिवशी संपर्क करत झालेल्या कामाची माहिती देत पुढील नियोजनाची विचारणा स्वतः मा.मुख्याधिकारी करत असल्यामुळे घन वन प्रकल्पाच्या पूर्वतयारीला गती मिळाली. अवघ्या आठ दिवसात सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या स्व खर्च व श्रमदानातून घन वन प्रकल्पाची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली त्यानंतर मोरया प्रतिष्ठान परिवाराच्या प्रतिनिधींना घन वन प्रकल्पाच्या आखणी व रोपांच्या वर्गीकरणासाठी अधिकृत वाहतूक पास देत लोणार येथे येण्याचे निमंत्रण दिले.


दि.०१ ऑगस्ट ( बुधवार ) रोजी घन वन प्रकल्प स्थळी तंत्रशुद्ध पद्धतीने आखणी करत वृक्षारोपणासाठी आणलेल्या *१३००* रोपांचे वर्गीकरण करण्यात आले.


घन वन प्रकल्पाचा शुभारंभ लोणार नगर परीषदेचे जेष्ठ कर्मचारी जाधव व बोरे यांच्या हस्ते करत नामफलकाचे अनावरण करण्यात आले.


*सहस्त्र घन वन प्रकल्प* असे या घन वन प्रकल्पाचे नामकरण करत मोरया प्रतिष्ठान,सेलूच्या सहकार्याची दखल घेत फलकावर नोंद करण्यात आली.


उपक्रमस्थळी उपस्थितांकडून सोशल डिस्टनसींगचे पालन करत कर्मचारी अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


मोरया प्रतिष्ठान परिवाराने केलेल्या सहकार्याचे कौतूक करत स्व खर्चाने व श्रमदानाने विकसित केलेल्या सहस्त्र घन वन प्रकल्पात लावलेल्या प्रत्येक रोपाचे रूपांतर वृक्षात करण्याचा संकल्प लोणार नगर परिषदेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी केला तसेच सोशल मिडियाद्वारे निर्माण झालेले *सेलू-लोणार सरोवरचे ऋणानुबंध* प्रत्यक्षात अनुभवून ते भविष्यात सुद्धा जतन करणार असल्याचे नगर परिषद लोणारचे मा.मुख्याधिकारी व मोरया प्रतिष्ठानचे प्रतिनिधी यांनी सांगितले.


*मा.मुख्याधिकारी विठ्ठल केदारे व नगर परिषद लोणार सरोवरच्या सर्व कर्मचारी अधिकारी वतीने मोरया प्रतिष्ठान चे अध्यक्ष अभिजित राजुरकर व टिमचे सेलू शहराचे नाव जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवर येथे उपक्रमाच्या माध्यमातून कोरल्या गेल्यामुळे व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.!!*



 


टिप्पण्या