धनगर साम्राज्य सेनेचे शुक्रवारपासून *सेल्फी वुईथ मेढपांळ* अभियान

गंगाखेड जी परभणी  धनगर समाजाच्या विविध प्रश्नासह मेंढपाळावरिल हल्ले रोखण्यासाठी महाराष्ट्रभर काम करत असलेल्या धनगर साम्राज्य सेनेकडून शुक्रव...


गंगाखेड जी परभणी 


धनगर समाजाच्या विविध प्रश्नासह मेंढपाळावरिल हल्ले रोखण्यासाठी महाराष्ट्रभर काम करत असलेल्या धनगर साम्राज्य सेनेकडून शुक्रवारपासून (7 ऑगस्ट) महाराष्ट्रभर *सेल्फी वुईथ मेंढपाळ* हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष,परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली. 


 


कोरोना आणि पावसाळा सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवावर ठिकाणी हल्ले होत आहेत. मेंढ्या चारण्याच्या कारणावरून प्रस्थापित लोकांकडून मेंढपाळांच्या मेंढ्यांचे पिल्ले ओढून नेणे, धमकावणे, त्यांच्या महिलांना शिवीगाळ करणे आधी प्रकार होत आहे. काही ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून मेंढपाळावर शासकीय कामात अडथळा केल्याचे खोटे गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. या सर्व प्रकारामुळे महाराष्ट्रातील मेंढपाळ समाज हा गोंधळलेल्या व भयभित झालेल्या अवस्थेत आहे. कोरोना संकटाच्या काळात एक तर कोणी जवळ येऊ द्यायला तयार नाही आणि त्यात या अडचणी मुळे मेंढीपालन व्यवसाय संकटात आला आहे. यामुळे एकटा पडलेल्या या मेंढपाळाचा धीर देण्यासाठी शुक्रवारपासून 'सेल्फी वुईथ मेढपाळ' हे अभियान सुरू करण्यात येत आहे. शुक्रवारपासून (7 ऑगस्ट) सुरु होणारे अभियान सात दिवस चालणार असून अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी 13 ऑगस्ट रोजी याची सांगता होणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून धनगर सासाम्राज्य सेनेचे पदाधिकारी आपापल्या भागातील मेंढपाळांच्या भेटी घेऊन त्यांच्या सोबत सेल्फी काढत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत. एकूणच यामुळे मेंढपाळांत समाज आपल्या पाठीमागे असल्याची भावना वाढीस लागणार आहे. सेल्फी काढून जमा केलेले हे फोटो मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे पाठवण्यात येणार आहेत. हे अभियान यशस्वी करण्यासाठी धनगर साम्राज्य सेना चे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रविकांत हारकळ, युवा प्रदेशाध्यक्ष आशुतोष शेंडगे पाटील , विदर्भ प्रदेश प्रमुख श्रीकांत भुजाडे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख राहुल धनगर, विद्यार्थी आघाडीचे राम भंडारे, सोलापूरचे जिल्हाप्रमुख महादेव बुट्टे, अहमदनगर जिल्हा प्रमुख सौरभ भांड, औरंगाबाद जिल्हाप्रमुख उमेश हराळ, पुणे जिल्हाप्रमुख बोराडे,जिल्हा अध्यक्ष अकोला जनक खताळ,जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर बिरुदेव जानकर,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष भारत ठुमके,सोलापूर जिल्हा अध्यक्ष महादेव बुटे,सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष राकेश खरात,वाशिम जिल्हा अध्यक्ष राम ढवळे,शुभम काळे पुणे जिल्हा अध्यक्ष,नागपूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत भुजाडे,हिंगोली जिल्हा अध्यक्ष संतोष मस्के,अमोल बोराडे पुणे जिल्हा अध्यक्ष,चैतन्य शेंडगे सातारा जिल्हाध्यक्ष.नाशिक जिल्हा प्रमुख जितेंद्र सोनवणे,, बीड जिल्हा प्रमुख यशवंत काळे, लातूर जिल्हा प्रमुख ज्ञानोबा शिंदे आदीसह धनगर साम्राज्य सेनेचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व विविध सेलचे पदाधिकारी पुढाकार घेत आहेत.


COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel