विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे शिल्पकार शिक्षकच असतात _ श्री . साहेबराव फड
परळी -प्रतिनिधी - ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी येथील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले या यशाबद्दल संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड व संस्थेचे अध्यक्ष राजेभाऊ जब्दे आणि संस्थेच्या उपाध्याक्षा सौ . गयाबाई फड यांनी शिक्षकांचा सत्कार करून अभिनंदन केले आहे . शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेतील यशाची परंपरा राखत यावर्षी एकूण शाळेचा निकाल 96 .38 एवढा लागला आहे यामध्ये सेमी च्या वर्गातून प्रथम कु . हालगे भक्ती भिमाशंकर _ 98.8O, द्वितीय चि . शास्त्री मयुरेश विजयकुमार -96 .2O, तृतीय चि . सोळंके संकेत ज्ञानोबा _ 95.4O टक्के गुण प्राप्त केले आहेत तसेच मराठीच्या वर्गातून प्रथम कु . वाघमारे आयोध्या सूर्यकांत _ 92.4O, द्वितीय कु . पोतदार स्वाती राजेंद्र _ 88.4O, तृतीय लांडगे गायत्री गुणाजी-85 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे तसेच शाळेतून विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी संख्या 33 तर प्रथम श्रेणीमध्ये27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत दरवर्षीपेक्षा यावर्षी निकालाचे प्रमाण वाढून गुणवत्तेचे प्रमाणही वाढले आहे याबद्दल संस्थेच्या पदाधिकारी यांनी हा शिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता वर्ग दहावीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे शाल पुष्पगुच्छ देवून व पेढे भरवून सर्व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी सर्व संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते या सत्कार समारंभाचे सुत्रसंचलन सहशिक्षक सचिन सोमवंशी यांनी केले तर आभार संतोष मुंडे यांनी मानले
COMMENTS