धर्माबाद तालुक्यातील पायोनियर डिस्लरीज कंपनी ने५०००ऐंटीजेन टेस्ट किट धर्माबाद च्या आरोग्य विभागास देण्याची मागणी

धर्माबाद तालुक्यातील पायोनियर डिस्लरीज कंपनी ने५०००ऐंटीजेन टेस्ट किट धर्माबाद च्या आरोग्य विभागास देण्याची मागणी धर्माबाद शहराचे माजी उपनगरा...

धर्माबाद तालुक्यातील पायोनियर डिस्लरीज कंपनी ने५०००ऐंटीजेन टेस्ट किट धर्माबाद च्या आरोग्य विभागास देण्याची मागणी धर्माबाद शहराचे माजी उपनगराध्यक्ष रमेश चंद्र तिवारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.



    धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद शहरापासून जवळच असलेल्या बहुचर्चित पायोनियर डिस्लरीज कंपनी च्या व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणा मुळै कंपनी त करोना बाधीत रुग्ण आढळले आहेत . सदरील रुग्णांच्या अनेक नातेवाईकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे धर्माबाद तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे.कोरोनाचा वाढता उद्रेक पाहुन माजी उपनगराध्यक्ष रमेश चंद्र तिवारी यांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कडे तालुक्यातील संशयीत कोरोना रुग्णांची तपासणी करण्यासाठी ऐंटीजेन रेपीड टेस्ट किट उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.


 सदरील मागणीची दखल खासदार चिखलीकर यांनी घेतली व येथील कोवीड सेंटरला ५००रेपीड टेस्ट किट उपलब्ध झाले.त्यानंतर २०० किट आल्याचे तहसीलदार शिंदे यांनी सांगितले .       


 


परंतु येथील पायोनियर डिस्लरीज कंपनी तील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या १९ जणांना कोरोनाची लागण झाली . एकुण २० कोरोना बाधीत रुग्ण आढळले . कंपनी च्या हलगर्जीपणा मुळै तिवारी यांच्या प्रयत्नातून व खासदार साहेबांच्या माध्यमातुन आलेले व इतर ६७० ऐंटीजेन रेपीड टेस्ट किट कंपनी तील संशयीत कोरोना रुग्णांची तपासणी करण्यात वापरण्यात आले.


 


कंपनीच्या हलगर्जीपणा मुळै तालुक्यातील जनतेवर कोरोनाचे मोठे संकट आले असल्याचे चर्चा जनतेतून होत आहे . म्हणुन कंपनीच्या व्यवस्थापनातील मंडळी वर कठोर कारवाई करावी व तालुक्यातील जनतेसाठी ५००० ऐंटीजेन रेपीड टेस्ट किट कंपनी कडून वसुल करण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष रमेश चंद्र तिवारी यांनी जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी सचीन खल्लाळ वसोबतच खासदार चिखलीकर यांच्या कडे केली आहे.   


 


गेल्या चार महिन्यांच्या कोरोना काळात पायोनियर डिस्लरीज कंपनी ने धर्माबाद शहर व तालुक्यातील जनतेसाठी कोणतीही मदत केली नाही . शासनाला कंपनी च्या माध्यमातून करोडो रुपयांचा नांदेड जिल्ह्यातील सर्वात जास्ती चा कर मिळतो नांदेड जिल्ह्यातील सर्वात जास्त कर भरणारा तालुका असताना सुद्धा धर्माबाद तालुका विकासात्मक कामासाठी सदैव वंचित व दुर्लक्षित का? 


 


कंपनी कडून धर्माबाद तालुक्याला काय फायदा असा सवाल रमेश चंद्र तिवारी उपस्थित केला आहे .


 


तिवारी यांनी केलेली मागणी धर्माबाद तालुक्यातील जनतेच्या हितासाठी असल्यामुळे त्यांचे तालुक्यातील जनतेतून कौतुक होत आहे.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel