आयोद्या येथे प्रभु श्रीराम मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते सुरु करण्यात आला. अखंड भारतात याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंदिर उभारणीसाठी झालेल्या व्यापक लढ्यात लाखो कारसेवक सामील होते. यात माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पंचक्रोशीतील कारसेवकांचा गट वैजनाथ नागपूरे यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत गेला होता. या सर्व कारसेवकांचा सत्कार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी कक्ष प्रमुख तथा गावचे भुमीपुत्र ओमप्रकाश शेटे यांनी केला. यावेळी सदरील कारसेवकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात केली. कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदी च्या नियमांचे पालन करत हा छोटेखानी सत्कार सोहळा संपन्न झाला.
रामजन्मभूमी आंदोलनात कारसेवक म्हणून सेवा दिलेले दिंद्रुडचे रामभक्त किशोर देशमुख, शिवाजी शिंदे, शिवशंकर काटकर , तुळशीराम पांचाळ, भाऊसाहेब गौंडर, महादेव कटारे, श्रीराम काळे, लक्ष्मण पांचाळ, सोनू चोरघडे , विश्वनाथ चोरघडे, अनिल खडके, पिंटू पांचाळ, यांचा सत्कार केला.
यावेळी बंडू खांडेकर, प्रदीप ठोंबरे, नागेश ठोंबरे, दत्ता शिंदे, भगवान कांदे, सचिन रायकर व श्री चोरघडे, बाबा देशमाने, अमोल ठोंबरे व नागेश वकरे उपस्थित होते.
COMMENTS